मुंबई - Paris Olympics 2024 : भारताचा कुस्तीपटू अमन सेहरावतनं पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पुरुषांच्या फ्रीस्टाइल 57 किलो वजनी गटात कुस्तीमध्ये कांस्यपदक जिंकून भारतीयांचा अभिमान वाढवला आहे. या विजयामुळं बॉलिवूडपासून तर टॉलिवूडपर्यंतच्या सेलिब्रिटींनी जल्लोष केला आहे. सोशल मीडियावर सामंथा रुथ प्रभू, रणवीर सिंग, रकुल प्रीत सिंग, करिना कपूर यांसारख्या स्टार्सनी अमनचं अभिनंदन केलं आहे. अमन सेहरावतनं पुरुषांच्या फ्रीस्टाइल 57 किलो कुस्तीमध्ये कांस्यपदक जिंकून भारताला या ऑलिम्पिकमधील सहावं पदक मिळवून दिलं आहे. याशिवाय अनेकजण अमन जिंकल्यानंतर खूप खुश आहेत.
More pride thanks to our wrestlers!
— Narendra Modi (@narendramodi) August 9, 2024
Congratulations to Aman Sehrawat for winning the Bronze Medal in the Men's Freestyle 57 kg at the Paris Olympics. His dedication and perseverance are clearly evident. The entire nation celebrates this remarkable feat.
स्टार्सनं केलं अमन सेहरावतचं कौतुक : करोडो भारतीयांनी अमनचं सोशल मीडियावर अभिनंदन केलं आहे. साऊथ स्टार समांथा रुथ प्रभूनं अमनचा फोटो शेअर करत लिहिलं, "अभिनंदन अमन सेहरावत." अमन आणि भालाफेक विजेता नीरज चोप्राचं अभिनंदन करताना महेश बाबूनं त्याच्या पोस्टवर लिहिलं ,"शुभेच्छा, मला खूप आनंद आणि अभिमान वाटत आहे. बॉलिवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंगनं तिच्या पोस्टवर लिहिलं, "हार्दिक अभिनंदन अमन सेहरावत, कांस्यपदक जिंकल्याबद्दल तुझे अभिनंदन, तू भारताचा गौरव केला आहेस." अभिनेत्री कीर्ती सुरेशनं अमनचं अभिनंदन करत लिहिलं, "भारताचा सर्वात तरुण ऑलिम्पिक विजेता अमन सेहरावतला शुभेच्छा, ऐतिहासिक विजय आहे."
अमन सेहरावतनं रचला इतिहास : अमनचा फोटो शेअर करताना बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगनं लिहिलं, "हरियाणाचा शेर." ईशा गुप्तानं तिच्या पोस्टवर कौतुक करत लिहिलं, "अमन सेहरावत, तुम्ही तुमच्या विजयानं करोडो लोकांना प्रेरित केलं आहे. तुझा आम्हाला खूप अभिमान वाटला. याशिवाय करीना कपूर खान, विकी कौशल, दीपिका पदुकोण, सोनाली बेंद्रे, मीरा राजपूत या स्टार्सनी पदक जिंकल्याबद्दल अमनचं अभिनंदन केलंय. भारतीय कुस्तीपटू अमन सेहरावतनं 9 ऑगस्ट रोजी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पुरुषांच्या फ्रीस्टाइल 57 किलो कुस्तीमध्ये पोर्तो रिकोच्या डेरियन क्रूझचा 13-5 असा पराभव करून कांस्यपदक जिंकलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही अमनच्या विजयाबद्दल अभिनंदन केलंय. त्यांनी त्याच्या पोस्टवर लिहिलं, "आम्हाला आमच्या कुस्तीपटूंचा अधिक अभिमान आहे! पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पुरुषांच्या फ्रीस्टाइल 57 किलोमध्ये कांस्यपदक जिंकल्याबद्दल अमन सेहरावतचं अभिनंदन." याशिवाय आता अनेकजण पोस्ट शेअर करून अमन सेहरावतचं कौतुक करताना दिसत आहेत.
हेही वाचा :
- विनेश फोगटप्रमाणेच अमन सेहरावतचंही वाढलं होतं वजन, 10 तासांत 4.6 किलो वजन कमी करत रचला इतिहास; कसा घडला 'चमत्कार'? - Paris Olympics 2024
- पॅरिसमध्ये 21 वर्षीय अमननं रचला इतिहास! अखेर भारताला कुस्तीत पदक मिळालं - Paris 2024 Olympics
- भारतीय कुस्तीपटू अमन सेहरावत उपांत्य फेरीत पराभूत, उद्या कांस्यपदकासाठी लढणार - Paris Olympics 2024