मुंबई - अभिनेत्री परिणीती चोप्रा हिला चित्रपटसृष्टीत तिच्या सुरुवातीच्या काळात आर्थिक संघर्षाचा मोठा सामना करावा लागला होता. ट्रॅव्हलिंग बिझनेस क्लाससारख्या लक्झरी गोष्टी तिच्या अवाक्याच्या बाहेरच्या झाल्या होत्या. या सर्व गोष्टींचा लाभ तिनं कारकिर्द स्थिर झाल्यानंतरच घेतला. पर्सनल ट्रेनरला 4 लाख दर महिना देणं परवडत नसल्यामुळे तिनं तो ठेवला नव्हता. यामुळे तिच्या एका सहकलाकाराने तिची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न केला होता, त्याचा अनुभव यानिमित्तानं सांगितला आहे.
एका पॉडकास्टला दिलेल्या मुलाखतीत परिणीतीनं आपली पार्श्वभूमी सांगितली, यामध्ये ती मध्यमवर्गीय घरात वाढल्यामुळे तिचा ग्लॅमरच्या जगाशी संबंध नव्हता याबाबत सांगितले. "मी फार श्रीमंत पार्श्वभूमीतून आलेली नाही. खरं तर मी एक अतिशय साधी, मध्यमवर्गीय मुलगी आहे. मला बॉलीवूड खरोखरच कळत नव्हतं. मला खरंच माहित नव्हतं की मुंबईतील लोक कसे जगतात. जे लोक आधीच मुबंईत वाढलेले होते आणि ज्यांना हे जग नीट माहिती होते त्यांनी मला तोलण्याचा प्रयत्न केला," असं ती म्हणाली.
मुंबईत ऐश्वर्यामध्ये वाढलेला एक सहकलाकार परिणीतीकडे पर्सनल ट्रेनरला दरमहा द्यायला 4 लाख नाहीत म्हणून खिल्ली उडवत होता. तिने स्वत:चा बचाव केला आणि स्पष्ट केलं की तिने तिच्या पहिल्या चित्रपटासाठी 5 लाख रुपये माफक पैसे तिच्या खर्चासाठी मिळवले होते. परिणीती म्हणाली, "त्याचं म्हणणं होतं की, 'तुला जर परवडत नसेल तर तू या क्षेत्रात राहू नयेस'."
आयुष्यातील बारीकसारीक गोष्टी परवडत नसल्याबद्दल तिच्या सहकाऱ्यांनी तिला कायम जोखल्याचं परिणीतीनं सांगितलं. तिला सतत डिझायनर कपडे आणि अॅक्सेसरीज घालण्याचा सल्ला दिला जात होता, परंतु तिला माहित होतं की हे तिच्या क्षमतेच्या पलीकडचं आहे. जोपर्यंत तिचे पाच चित्रपट पूर्ण झाले नाहीत तोवर तिला तिचं बँक खाते स्वतःच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आर्थिकदृष्ट्या सुरक्षित वाटलं नव्हतं. त्यानंतर तिनं पूर्वी स्वप्न बाळगल्या प्रमाणे लक्झरियस जगायला सुरुवात केली.
हेही वाचा -
- 'कल्की एडी 2898'च्या निर्मात्यांनी शेअर केलं नवीन पोस्टर, आज होईल रिलीज तारखेची मोठी घोषणा - kalki 2898 ad
- 'तारक मेहता...' फेम अभिनेता गुरुचरण सिंग बेपत्ता, महत्त्वपूर्ण फुटेज पोलिसांच्या हाती - Gurucharan Singh Missing
- थलपती विजयच्या 'GOAT' ची उत्कंठा शिगेला, दुसरं गाणं जूनमध्ये झळकणार - Thalapathy Vijay