मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आज 22 ऑक्टोबर रोजी तिचा 36 वा वाढदिवस साजरा करत आहे. परिणीतीला आता अनेकजण सोशल मीडियाच्या माध्यामातून शुभेच्छा देत आहेत. परिणीतीची लाडकी मिमी दीदी उर्फ अभिनेत्री प्रियांका चोप्रानेही तिच्या चुलत बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. परिणीतीचे पती राघव चड्ढा यांनीही तिला शुभेच्छा देत काही सुंदर फोटो शेअर केले आहेत.
प्रियांका चोप्रा : मंगळवारी प्रियांका चोप्रानं चुलत बहीण परिणीती चोप्राला तिच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देणाऱ्या पोस्टमध्ये लिहिलं की, 'हॅपी बर्थडे 'तिशा'. तुला या खास दिवशी खूप सारे प्रेम पाठवत आहे.' परिणीतीनं तिच्या इंस्टाग्रामवर देसी गर्लची ही पोस्ट पुन्हा पोस्ट केली असून तिला 'थँक्यू मिमी दीदी' असं लिहिलंय.
राघव चढ्ढा : राघव चड्ढा यांनी इंस्टाग्रामवर आपल्या लेडी लव्हच्या सुंदर फोटो शेअर करत लिहिलं आहे की, 'तुझे हसणे, 'तुझा आवाज, तुझे सौंदर्य, तुझी शालीनता कधी कधी मला आश्चर्यचकित करून टाकते, की देवानं एका व्यक्तीमध्ये इतकी जादू कशी दिली? मला आशा आहे की तुमची सर्व स्वप्ने पूर्ण होतील. पारू, तू माझी सर्वात मौल्यवान भेट आहेस. तुझ्या चेहऱ्यावर जास्तीत जास्त हसू आणण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करत राहीन. वाढदिवसाच्या शुभेच्छा माझ्या प्रिंसेस.' शेअर केलेल्या पहिल्या फोटोत परिणीती बर्फाबरोबर खेळत आहे. दुसऱ्या फोटोमध्ये राघव चढ्ढा आणि परी एका ट्रिप दरम्यान बाहेर बसून कॅमेरासाठी पोझ देताना दिसत आहे. याशिवाय आणखी एका फोटोत राघव चढ्ढा हे परिणीतीच्या गालाची किस घेत आहे. असे अनेक फोटो राघव चढ्ढा यांनी या विशेष प्रसंगी शेअर केले आहेत.
'या' स्टार्सनं परिणीतीला दिल्या शुभेच्छा : राघवच्या पोस्टच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया देताना परिणीतीनं लिहिलं, 'रागी.' आणि इमोजी शेअर केले आहेत. याशिवाय तिनं इंस्टाग्राम स्टोरीवर राघव चढ्ढा यांना धन्यवाद म्हणत पोस्टमध्ये लिहिलं, 'ओएमजी 'हा माणूस देवाची भेट आहे.' तसेच परिणीतीच्या कुटुंबातील सदस्य, बेस्ट फ्रेंड सानिया मिर्झा, अथिया शेट्टी, जॅकी भगनानी, राजीव अडातिया यांच्यासह अनेकांनी तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
हेही वाचा :
- लग्नाच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त परिणीती चोप्रा राघव चढ्ढा यांना कुटुंबियांनी दिल्या शुभेच्छा - Wedding Anniversary
- "दरमहा 4 लाखाचा ट्रेनर परवडत नाही तर बॉलिवूड सोड" : परिणीती चोप्राला मिळाला होता सल्ला - Parineeti Chopra
- परिणीती चोप्रानं 'अमर सिंग चमकीला'च्या यशानंतर सिद्धिविनायक मंदिरात घेतलं दर्शन - PARINEETI CHOPRA