ETV Bharat / entertainment

अक्षय कुमार स्टारर 'भूत बंगला'मध्ये 'हे' 3 स्टार्स करेल एन्ट्री, 'ब्लॉकबस्टर'ची प्रतीक्षा संपणार? - Akshay kumar - AKSHAY KUMAR

Akshay Kumar Bhooth Bangala :अक्षय कुमार अभिनीत 'भूत बंगला' हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. आता या चित्रपटामध्ये तीन कॉमेडी स्टार्स एन्ट्री करणार आहेत.

Akshay Kumar Bhooth Bangala
अक्षय कुमार भूत बंगला (अक्षय कुमार (Movie Poster))
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : Sep 12, 2024, 11:55 AM IST

मुंबई - Akshay Kumar Bhooth Bangala : अभिनेता अक्षय कुमारनं 9 सप्टेंबर रोजी, त्याच्या 57 व्या वाढदिवशी 'भूत बंगला' या नवीन चित्रपटाची घोषणा करून चाहत्यांना एक भेट दिली होती. 'भूत बंगला' या हॉरर कॉमेडी चित्रपटाचं दिग्दर्शन प्रियदर्शन करत आहे. यापूर्वी प्रियदर्शननं अक्षय कुमारबरोबर 'भूल भुलैया' (2007) हा ब्लॉकबस्टर चित्रपट दिला होता. अक्षय आणि प्रियदर्शन आता 14 वर्षांनंतर पुन्हा एकदा धमाका करण्यासाठी बॉक्स ऑफिसवर येत आहेत. दरम्यान 'भूत बंगला' चित्रपटातील उर्वरित स्टारकास्टची नावे समोर आली आहेत. या चित्रपटात कोणते स्टार्स एन्ट्री करेल आहे, याबद्दल आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

'हे' स्टार्स करणार एन्ट्री : 'भूत बंगला' चित्रपटात प्रवेश करण्याऱ्या या स्टार्सनी आपल्या कॉमेडीनं अनेक चित्रपट 'ब्लॉकबस्टर' दिले आहेत. या तिन्ही स्टार्सने अक्षय कुमारबरोबर काम केलं आहे. या कलाकारांची नाव परेश रावल, राजपाल यादव आणि असरानी आहेत. अक्षय कुमारबरोबर कॉमेडी चित्रपटांचं हे त्रिकूट 'भूल भुलैया', 'हेरा फेरी' आणि 'गरम मसाला' या चित्रपटांमध्येही दिसलं आहे. या तिन्ही नावांची निर्मात्यांनी अद्याप पुष्टी केलेली नाही. आता सोशल मीडियावर 'भूत बंगला' हा चित्रपट हिट होणार, याची खात्री अनेकजण देत ​​आहेत. सोशल मीडियावर सध्या या त्रयीबद्दल चर्चा होताना दिसत आहेत.

चाहत्यांच्या प्रतिक्रिया : या चित्रपटाबाबत एका चाहत्यानं लिहिलं - अक्षय आणि या त्रिकुटाचा कोणताही चित्रपट फ्लॉप नाही, 'भूत बंगला' हिट होईल. दुसऱ्या एका युजरनं लिहिलं की - बऱ्याच दिवसांनी या सर्वांना एकत्र पाहण्याची संधी मिळणार आहे. आणखी एका यूजरनं लिहिलं की - 'भूत बंगला' चित्रपट 'भूल भुलैया'पेक्षाही मोठा हिट ठरू शकतो. 'भूत बंगला' पुढील वर्षी 2025 मध्ये रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची रिलीज डेट सध्या समोर आलेली नाही. 'भूत बंगला' चित्रपटाची निर्मिती बालाजी टेलिफिल्म्स आणि केप ऑफ गुड्स फिल्म्स यांनी संयुक्तपणे केली आहे. या चित्रपटाच्या निर्मात्या एकता कपूर आणि शोभा कपूर आहेत.

हेही वाचा :

  1. अक्षय कुमारचे आगामी चित्रपट कधी प्रदर्शित होईल?, जाणून घ्या तारीख... - akshay kumar
  2. अक्षय कुमारनं 14 वर्षांनंतर प्रियदर्शनबरोबर 'भूत बंगला'ची केली घोषणा, फर्स्ट लुक रिलीज - Akshay Kumar
  3. अक्षय कुमारचा 'हा' चित्रपट 'स्त्री 2'ला देणार टक्कर, वाढदिवसानिमित्त करणार मोठी घोषणा - Akshay Kumar

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.