ETV Bharat / entertainment

पंकज त्रिपाठी स्टारर 'मैं अटल हूं' ओटीटीवर होणार लवकरच रिलीज ; पाहा तारीख - Main Atal Hoon Ott release date

Main Atal Hoon Ott Release: पंकज त्रिपाठी अभिनीत 'मैं अटल हूं' ओटीटीवर रिलीजसाठी सज्ज आहे. हा चित्रपट कधी आणि कुठे प्रदर्शित होईल हे जाणून घेण्यासाठी वाचा.

Main Atal Hoon Ott Release
मैं अटल हूं ओटीटी रिलीज
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 10, 2024, 5:51 PM IST

मुंबई - Main Atal Hoon Ott Release : माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जीवनावर आधारित 'मैं अटल हूं' हा चित्रपट लवकरच ओटीटीवर रिलीज होणार आहे. या चित्रपटामध्ये अभिनेता पंकज त्रिपाठी हे मुख्य भूमिकेत आहे. 'मैं अटल हूं' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही खास कामगिरी करू शकला नाही . या चित्रपटानं बॉक्स ऑफिस खूप कमाई केली होती. या चित्रपटाकडून पंकज त्रिपाठीला खूप अपेक्षा होत्या, मात्र हा चित्रपट फ्लॉप झाला. आता 'मैं अटल हूं' हा चित्रपट प्रेक्षकांना घरी बसून पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट कधी आणि कोणत्या प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार, हे आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

'मैं अटल हूं' ओटीटी होणार प्रदर्शित : आज अधिकृत स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म झी5नं 'मैं अटल हूं' या चित्रपटाच्या डिजिटल रिलीजची तारीख जाहीर केली आहे. हा चित्रपट 14 मार्च 2024 रोजी प्रदर्शित होणार आहे. आता या इंस्टाग्राम पोस्टमध्ये झी5 ओटीटी प्लॅटफॉर्मनं चित्रपटातील कलाकार आणि क्रू यांना देखील टॅग केलं आहे. याशिवाय त्यांनी या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिलं, 'तयारी सुरू करा, अटल बिहारी येत आहेत, 'मैं अटल हूं' 14 मार्च रोजी झी5 वर प्रीमियर होईल.'' या चित्रपटामध्ये अटल बिहारी यांचा राजकिय प्रवास दाखविण्यात आला आहे. अटल बिहारी हे पंतप्रधान, कवी आणि राजकारणी म्हणूनही प्रसिद्ध होते. पंकज त्रिपाठीनं या चित्रपटामध्ये अटल बिहारी यांची भूमिका साकारली आहे.

पंकज त्रिपाठीचे आगामी चित्रपट : 'मैं अटल हूं' या चित्रपटात पीयूष मिश्रा, दया शंकर पांडे, राजा सेवक, एकता कौल आणि इतर अनेक प्रतिभावान कलाकारांचाही समावेश आहे. 'मैं अटल हूं' 19 जानेवारी 2024 रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला होता. आता हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होत असल्यानं अनेकजण खूश आहेत. झी5नं शेअर केलेल्या पोस्टवर अनेकजण आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. 'मैं अटल हूं' या चित्रपटाचं दिग्दर्शन रवी जाधव यांनी केलंय. दरम्यान पंकज त्रिपाठीच्या आगामी चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर तो 'मेट्रो इन दिनो', 'मर्डर मुबारक', 'ठग लाइफ' आणि 'अभी तो पार्टी शुरू हुई है' या चित्रपटांमध्ये दिसणार आहेत.

हेही वाचा :

  1. राखी सावंतचा पूर्वाश्रमीचा पती आदिल खान दुर्राणीबरोबर लग्न केल्यानंतर सोमी खाननं दिली प्रतिक्रिया
  2. भारतीय वंशाच्या दिग्दर्शकाला मिळणार का ऑस्कर? वाचा, ऑस्कर 2024 नामांकनाची संपूर्ण यादी
  3. कार्तिक आर्यननं 'भूल भुलैया 3'च्या पहिल्या दिवसाच्या शूटची झलक केली शेअर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.