मुंबई Main Atal Hoon BO Collection : पंकज त्रिपाठी स्टारर 'मैं अटल हूं' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपेक्षापेक्षा कमी कमाई करताना दिसत आहे. 'मैं अटल हूं'चा फर्स्ट लूक समोर येताच सर्वांनाच या चित्रपटाबद्दल उत्सुकता वाटू लागली होती. भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या लूकमध्ये पंकज त्रिपाठी पाहून अनेकजण सोशल मीडियावर या चित्रपटाला पाठिंबा देताना दिसले. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाची अवस्था इतकी वाईट आहे की, हा चित्रपट फक्त काही लाखोंची कमाई करत आहे. 'मैं अटल हूं'ची कमाई पाहाता हा चित्रपट फार काळ बॉक्स ऑफिसवर सुरू राहणार नाही. हा चित्रपट 19 जानेवारीला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला.
'मैं अटल हूं'ची एकूण कमाई : 'मैं अटल हूं' चित्रपट समीक्षकांना आवडला आहे. या चित्रपटाचे रिव्ह्यू अनेकांनी चांगले दिले आहेत. 'मैं अटल हूं'चं दिग्दर्शन रवी जाधव यांनी केलंय. याशिवाय या चित्रपटाची कहाणी ऋषी विरमानी यांनी लिहिली आहे. हा चित्रपट पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या संघर्षावर आधारित आहे. सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार या चित्रपटानं रिलीजच्या पहिल्या दिवशी 1.15 कोटी रुपये, दुसऱ्या दिवशी 2.1 कोटी रुपये, तिसऱ्या दिवशी 2.4 कोटी रुपये, चौथ्या दिवशी 7 लाख रुपये, पाचव्या दिवशी 75 लाखची कमाई केली. रिलीजच्या सहाव्या दिवशी या चित्रपटानं फक्त 60 लाख रुपये कमावले आहेत. या चित्रपटची बॉक्स ऑफिसवर एकूण कमाई 7.80 कोटी झाली आहे.
अटल बिहारी वाजपेयीची राजकीय कारकीर्द : या चित्रपटामध्ये पंकज त्रिपाठीबरोबरच बेनेडिक्ट गॅरेट, हर्षल गिरे, हर्षद कुमार, प्रिती श्रॉफ आणि इतर कलाकार आहेत. हा चित्रपट वीकेंडला बॉक्स ऑफिसच्या बाहेर पूर्णपणे पडद्यावरून उतरू शकतो, कारण हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोणचा 'फायटर' रिलीज झाला आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड वेगानं कमाई करेल अशी अपेक्षा सध्या केली जात आहे. दरम्यान 'मैं अटल हूं' बद्दल बोलायचं झालं तर हा एक चरित्रात्मक चित्रपट आहे, ज्यामध्ये पंकज त्रिपाठी यांनी देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची भूमिका साकारली आहे. अटल बिहारी वाजपेयी यांची राजकीय कारकीर्द आणि देशासाठीचे योगदान या चित्रपटात दाखवण्यात आलं आहे.
हेही वाचा :