मुंबई - Ajay Devgn, Shaitaan : हिंदी चित्रपटसृष्टीचा अभिनेता अजय देवगण आणि आर. माधवन स्टारर 'शैतान' हा चित्रपट 8 मार्च रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. हा चित्रपट या वर्षातील आतापर्यंतच्या सर्वात हिट चित्रपटांपैकी एक आहे. प्रेक्षकांना हा सुपरनॅचरल थ्रिलर चित्रपट इतका आवडला आहे की त्याची क्रेझ अजूनही लोकांमध्ये कायम आहे. 'शैतान' चित्रपट तुम्ही अजून पाहिला नसेल, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी तुम्हाला थिएटरमध्ये जाण्याची गरज नाही. तुम्ही घरी बसून या चित्रपटाचा आनंद घेऊ शकता. 'शैतान' चित्रपट लवकरच ओटीटीवर रिलीज होणार आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
'शैतान' ओटीटीवर होणार प्रदर्शित : मिळालेल्या माहितीनुसार थिएटरमध्ये रिलीज झाल्यानंतर 'शैतान' 3 मे रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे डिजिटल अधिकार नेटफ्लिक्सकडे असल्याचं समजत आहे. याबद्दल अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही. विकास बहल दिग्दर्शित 'शैतान' चित्रपटाची निर्मिती अजय देवगण, ज्योती देशपांडे, कुमार मंगत पाठक आणि अभिषेक पाठक यांनी केली आहे. या चित्रपटात साऊथ अभिनेत्री ज्योतिका अजय देवगणच्या पत्नीच्या भूमिकेत आहे. तर आर. माधवन खलनायकाच्या भूमिकेत दिसत आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
अजय देवगणचं वर्कफ्रंट : या चित्रपटाच्या कहाणी एका कुटुंबाभोवती फिरते, ज्याला एका माणसानं आपल्या शैतानी जादूनं बंधक बनवून ठेवलं आहे. आतापर्यंत या चित्रपटानं 138.77 कोटी रुपयांची कमाई बॉक्स ऑफिसवर केली आहे. हा चित्रपट अनेकांना आवडला आहे. या चित्रपटात अजय देवगण, आर. माधवन, ज्योतिका व्यतिरिक्त जानकी बोडीवाला आणि अंगद राज यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाचा रन टाईम 2 तास 20 मिनिटांचा आहे. दरम्यान अजय देवगणच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं, तर तो 'मैदान', 'सन ऑफ सरदार 2', 'गोलमाल 5', औरों में कहां दम था', 'दे दे प्यार दे 2', 'वश' , 'रेड 2' आणि 'सिंघम अगेन'मध्ये दिसणार आहे. त्याचा 'सिंघम अगेन' हा चित्रपट रुपेरी पडद्यावर स्वातंत्र्य दिवसाच्या मुहूर्तावर रिलीज होणार आहे.
हेही वाचा :