मुंबई Oscar 2024 Nominations Live : 96व्या अकादमी पुरस्कार 2024 (ऑस्कर) साठी नामांकन आज 23 जानेवारी रोजी होणार आहेत. यंदा गोल्डन ग्लोब्स आणि क्रिटिक्स चॉईस अवॉर्ड्स जिंकणारे 'ओपनहायमर', 'बार्बी', 'किलर्स ऑफ द फ्लॉवर्स मून' या हॉलिवूड चित्रपटांचा पुन्हा बोलबाला ऑस्कर नामांकनामध्ये पाहायला मिळणार आहे. 96व्या ऑस्कर नामांकनाचं थेट प्रक्षेपण होणार आहे. मंगळवार, 23 जानेवारी रोजी स्थानिक वेळेनुसार सकाळी 8.30 वाजता लॉस एंजेलिस, अमेरिकेतील अकादमीच्या सॅम्युअल गोल्डविन थिएटरमधून नामांकनांची घोषणा केली जाणार आहे.
ऑस्करचं नामांकन : आज 23 जानेवारी रोजी संध्याकाळी 7 वाजता भारतात हा कार्यक्रम प्रसारित केला जाणार आहे. ऑस्कर डॉट कॉम आणि एबीसी सारख्या अकादमीच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर 96व्या ऑस्कर पुरस्काराचे तुम्ही नामांकन पाहू शकता. यावेळी जैजी बीट्ज आणि जैक क्वॅड सर्व 23 श्रेणींमध्ये नामांकन जाहीर केलं जाणार आहे. गेल्या वेळी अहमद आणि अॅलिसन विल्यम्स यांनी याची घोषणा केली होती. आता यावेळी जिमी किमेल 96वा अकादमी पुरस्कार होस्ट करणार आहे. अमेरिकेत ऑस्कर अवॉर्ड्स 10 मार्च रोजी संध्याकाळी 7 वाजता दिली जाणार आहेत. भारतात हा कार्यक्रम 11 मार्च रोजी पहाटे 5.30 वाजता दिसेल.
कोणते चित्रपट आणि कलाकार येतील : गेल्या वर्षी प्रदर्शित झालेले चित्रपट, 'ओपनहायमर', 'बार्बी', 'किलर्स ऑफ द फ्लॉवर्स मून', 'पुअर थिंग्ज' आणि 'द होल्डओव्हर्स' हे ऑस्कर जिंकण्याच्या रेसमध्ये प्रामुख्यानं असतील असा अंदाज आहे. याशिवाय या स्पर्धेत 'अॅनाटॉमी ऑफ अ फॉल', 'मेस्ट्रो', 'द जोन ऑफ इंस्टरेस्ट', 'पास्ट लाइव्स' असे अमेरिकन फिक्शन चित्रपट देखील अनेक श्रेणींमध्ये मोठ्या चित्रपटांना टक्कर देताना दिसतील. यावर्षी अभिनेता सिलियन मर्फी, अभिनेत्री एम्मा स्टोन, रॉबर्ट डाउनी जूनियर आणि ख्रिस्तोफर नोलन यांसारखे कलाकार ऑस्कर मिळवू शकतात.
96 व्या अकादमी पुरस्कारांचे वेळापत्रक
- नामांकन घोषणा- 23 जानेवारी 2024
- नॉमिनी लंचियोन - 12 फेब्रुवारी 2024
- अंतिम मतदान सुरू - 22 फेब्रुवारी 2024
- साइंटिफिक आणि टेक्नीकल अवार्ड - 23 फेब्रुवारी 2024
- अंतिम मतदान – 27 फेब्रुवारी 2024
- विजेत्यांची घोषणा (समारंभ) 10 मार्च 2024 (11 मार्च 2024 भारतात पहाटे 5.30 वाजता)
हेही वाचा :