ETV Bharat / entertainment

कमल हसनच्या 70 व्या वाढदिवसाची निर्मात्यांनी केली जय्यत तयारी, 'ठग लाईफ'चं पोस्टर लॉन्च - KAMAL HAASAN BIRTHDAY

Thug Life poster कमल हसनच्या 70 व्या वाढदिवसाचं औचित्य साधून 'ठग लाईफ' चित्रपटाच्या निर्मात्यांनी पोस्टर लॉन्च केलं आहे. यामध्ये कमल हासनच्या पात्राचा परिचय होत आहे.

Kamal Haasan's Thug Life poster
'ठग लाईफ'चं पोस्टर लॉन्च (Kamal Haasan's Thug Life poster (Image Source: X@ManiRatnam))
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : Nov 6, 2024, 11:35 AM IST

मुंबई - साऊथ फिल्म इंडस्ट्रीचा प्रतिभावान सुपरस्टार अभिनेता कमल हासन 7 नोव्हेंबर रोजी आपला 70 वा वाढदिवस साजरा करत आहे. त्याच्या या खास दिवसाचं सेलेब्रिशन करण्यासाठी निर्मात्यांनी योग्य औचित्य शोधलं आहे. मणिरत्नम दिग्दर्शित 'ठग लाइफ' या आगामी चित्रपटाच्या निर्मात्यांनी खास पोस्ट शेअर केलं आहे.

हा दिवस आणखी खास बनवण्यासाठी, 'ठग लाइफ'च्या निर्मात्यांनी चाहत्यांसाठी खास भेट म्हणून चित्रपटामधील कमल हासनचं फर्स्ट लूक पोस्टर लॉन्च केलं आहे. त्याच्या वाढदिवसाच्या सेलेब्रिशनमध्ये या लूकसह सर्वांचाच उत्साह वाढवला आहे.

"कमल हासन सरांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी सज्ज व्हा, 7 नोव्हेंबर रोजी एक सण उत्सवाची प्रतीक्षा करत आहे. 7 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता ठगांपासून सावध रहा", असं म्हणत कमल हासनच्या बर्थ डे सेलेब्रिशनची तयारी केली आहे.

'ठग लाइफ' या चित्रपटात कमल हासन एका ठगाची भूमिका साकारणार असल्याचं स्पष्ट झालंय. कमल हासन भूमिका करणार असलेल्या पात्राचं पन्सिलनं बनवलेलं कलात्मक चित्र पोस्टर म्हणून शेअर करण्यात आलं आहे.

मणिरत्नम दिग्दर्शित 'ठग लाइफ' या हा चित्रपट एक गँगस्टर ड्रामा म्हणून ओळखला जातो. राज कमल फिल्म्स इंटरनॅशनल आणि मद्रास टॉकीज यांनी या चित्रपटाची सह-निर्मिती केली आहे. या चित्रपटात जयम रवी, त्रिशा, अभिरामी आणि नासर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटाचे संगीत ए आर रहमान यांनी दिलं आहे.

गेल्या वर्षी, कमल हासनच्या वाढदिवसाच्या आधी, निर्मात्यांनी चित्रपटाच्या शीर्षकाचे लॉन्चिंग केलं होतं. राज कमल फिल्म्स इंटरनॅशनल या चित्रपटाच्या प्रॉडक्शन हाऊसनं चाहत्यांना एक मनोरंजक टायटल अनाउन्समेंटचा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला होता.

सुपरस्टार कमल हासन आणि दिग्दर्शक मणिरत्नम यांचा १९८७ मध्ये 'नायकन' हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. त्यानंतर ३५ वर्षांनी ही जोडी पुन्हा एकदा एकत्र येणार आहे. तमिळ सिनेमाचा उलगनायगन कमल हासन चित्रपट निर्माते मणिरत्नम या जोडीचा करिष्मा नव्या पिढीला पहिल्यांदाच ठग लाईफच्या निमित्तानं पाहायला मिळणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.