मुंबई - 2024 हे वर्ष भारतासाठी खूप चांगले ठरले आहे. यावर्षी भारतानं जगभरातील सौंदर्य स्पर्धांमध्ये आपला दबदबा कायम राखला. यावेळी अनेक स्पर्धांमध्ये भारतानं आपले वर्चस्व गाजवले. आता मिस ग्रँड इंटरनॅशनलनंतर, भारताच्या तृष्णा रायनं मिस टीन युनिव्हर्स 2024चा खिताब जिंकला आहे. आता संपूर्ण जगाच्या नजरा मिस युनिव्हर्स स्पर्धेकडे आहेत, जिथे भारताची रिया सिंघा एक मजबूत स्पर्धक म्हणून पाहिली जात आहे. मिस युनिव्हर्सच्या धर्तीवर दरवर्षी मुलींसाठी मिस टीन युनिव्हर्स स्पर्धा आयोजित केली जाते. यावेळी मिस टीन युनिव्हर्स 2024 दक्षिण आफ्रिकेतील किम्बर्ले येथे आयोजित करण्यात आली होती.
मिस टीन युनिव्हर्स स्पर्धेत भारताचं वर्चस्व : या स्पर्धेत जगभरातील किशोरवयीन सुंदर मुली मिस टीन युनिव्हर्स स्पर्धेत भाग घेतात. आता भारताची तृष्णा राय मिस टीन युनिव्हर्स विजेती झाल्यानंतर अनेकजण तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत. तृष्णा रायला स्पर्धेत मिस टीन युनिव्हर्स इंडियाचा मुकुट देण्यात आला आहे. तृष्णाची मिस टीन युनिव्हर्स स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निवड करण्यात आल्यानंतर ती खूप आनंदी झाली होती. तृष्णानं मिस टीन युनिव्हर्स 2024चा खिताब जिंकल्यानंतर जगभरात तिची आता चर्चा होत आहे. तृष्णा राय मूळ ओडिशाची रहिवासी असून तिचे वडील भारतीय सैन्य दलात कर्नल आहेत.
Congratulate #Odisha’s Trishna Ray on being crowned Miss Teen Universe 2024 in Kimberley, South Africa. May she scale new heights in her career and make our state proud. Wish her the best for the future. pic.twitter.com/xkqRa9FhGe
— Naveen Patnaik (@Naveen_Odisha) November 12, 2024
Congratulate #Odisha’s Trishna Ray on being crowned Miss Teen Universe 2024 in Kimberley, South Africa. May she scale new heights in her career and make our state proud. Wish her the best for the future. pic.twitter.com/xkqRa9FhGe
— Naveen Patnaik (@Naveen_Odisha) November 12, 2024
ओडिशाच्या तृष्णा रायनं जिंकला खिताब : कर्नल दिलीप कुमार राय आणि राजश्री राय यांची मुलगी तृष्णाचा ताजपर्यंतचा प्रवास खूप कठिण होता. यासाठी तिनं खूप परिश्रम केले. व्हिसा समस्यांमुळे कोलंबिया आणि डोमिनिकन रिपब्लिकमधील स्पर्धांमध्ये सहभागी होऊ न शकणे यासह अनेक अडचणींचा सामना तिला करावा लागला होता, तरीही तिनं हार मानली नाही. तृष्णा राय ही केआईआईटी विद्यालयमध्ये आपलं शिक्षण पूर्ण करत आहे. याशिवाय ओडिशाचे माजी मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी देखील एक्स अकाउंटवर तृष्णाचे अभिनंदत करत लिहिलं, 'ओडिशाच्या तृष्णा रायचे दक्षिण आफ्रिकेतील किम्बर्ले येथे मिस टीन युनिव्हर्स 2024चा मुकुट जिंकल्याबद्दल अभिनंदन. तिने आपल्या कारकिर्दीत नवीन उंची गाठावी आणि आपल्या राज्याचं नाव मोठे करावे, तिला तिच्या भविष्यासाठी शुभेच्छा.' आता या पोस्टवर देखील अनेकांनी हार्ट शेअर करून तिला शुभेच्छा दिल्या आहेत.