ETV Bharat / entertainment

'मी अजूनही जिवंत आहे', मृत्यूच्या अफवेवर संतापल्या अभिनेत्री नीना कुलकर्णी...

नीना कुलकर्णी यांनी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या खोट्या मृत्यूच्या अफवांवर मौन सोडले आहे. त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.

Neena kulkarni
नीना कुलकर्णी (Neena kulkarni - Instagram)
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : Oct 28, 2024, 5:59 PM IST

मुंबई - 69 वर्षीय मराठी अभिनेत्री नीना कुलकर्णी यांच्या निधनाच्या अफवा पसरल्यानंतर आता त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून त्यांच्या मृत्यूच्या खोट्या बातम्यावर प्रतिक्रिया दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून अनेक यूट्यूब चॅनल्सवर नीना कुलकर्णी यांच्या निधनाच्या बातम्या येत होत्या. यानंतर त्यांच्या मृत्यूच्या बातमीनं सोशल मीडियावर अनेक चाहत्यांनी दु:ख व्यक्त केलं होतं. काहींना नीना कुलकर्णी यांच्या मृत्यूची बातमी खरी वाटली होती. नीना यांच्या चाहत्यांना आता दिलासादायक बातमी आली असून, त्या जिवंत असल्याचा खुलासा झाल्यानंतर आता अनेकजण आनंदी झाले आहेत. दरम्यान इंटरनेटवर पसरणाऱ्या अशा अफवांवर आंधळेपणानं विश्वास ठेवू नये, असा देखील सल्ला नीना कुलकर्णी यांनी चाहत्यांना दिला आहे.

Neena kulkarni
नीना कुलकर्णी (Neena kulkarni - Instagram)

नीना कुलकर्णी यांच्या मृत्यूची बातमी : नीना कुलकर्णीच्या आधी इंदिरा भादुरी आणि श्रेयस तळपदे या सेलिब्रिटींच्या मृत्यूच्या अफवा सोशल मीडियावर पसरल्या होत्या. दरम्यान नीना कुलकर्णी यांनी त्याच्या पोस्टमध्ये इंस्टाग्रामवर लिहिलं की, 'यूट्यूबवर माझ्या मृत्यूची खोटी बातमी सुरू आहे. मी अजूनही जिवंत आहे आणि देवाच्या कृपेने कामात व्यग्र आहे. कृपया अशा अफवांवर लक्ष देऊ नका आणि त्यांचा प्रचार करू नका.' मृत्यूची बातमीलाही त्यांनी मूर्खपणा असल्याचं म्हटलं आहे. नीना कुलकर्णी यांनी अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं आहे. याशिवाय त्यांनी अनेक मालिकेत चमकदार कामगिरी केली आहे.

नीना कुलकर्णी यांचं वर्कफ्रंट : नीना कुलकर्णी यांच्या 'जीना इसी का नाम है', 'सान्याल रैना बोस कयामथ', 'कम्मल', 'बा बहू और बेबी', 'मेरी मॉं', 'धर्मराज देवयानी', एक पैकेट उम्मीद', 'ये है मोहब्बतें', 'अधूरी एक कहानी' या मालिका प्रसिद्ध आहेत. याशिवाय नीना यांनी 'नायक' 'सारथी' आणि 'लज्जा', 'दफन' सारख्या चित्रपटांमध्ये काम केलंय. गेल्या वर्षी, परेश रावलच्या 'शास्त्री विरुद्ध शास्त्री'चा यामध्येही त्या दिसल्या होत्या. अलीकडेच त्या झी 5वर अनुपम खेरच्या 'द सिग्नेचर'मध्ये झळकल्या होत्या.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.