ETV Bharat / entertainment

'आवेशम'च्या यशानंतर नाझरियाने फहाद फासिलला दिला 'चिल' राहण्याचा सल्ला - Fahadh Faasil - FAHADH FAASIL

अभिनेता फहाद फासिल त्याच्या अलीकडील चित्रपट 'आवेशम' च्या जबरदस्त यशानंतर त्याची पत्नी नाझरिया नाझीमसह समुद्रकिनारा गाठला आहे. दोघेही छान वेळ एकमेकांबरोबर घालवत आहेत.

Nazriya Asks Fahadh Faasil to 'Chill'
पत्नी नाझरियाने फहाद फासिलला दिला 'चिल' राहण्याचा सल्ला
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 30, 2024, 1:48 PM IST

मुंबई - साऊथचा अष्टपैलू अभिनेता फहाद फासिल त्याच्या नुकत्याच आलेल्या 'आवेशम' या चित्रपटाच्या यशाचा आनंद घेत आहे. आपल्या सततच्या शूटिंगमधून वेळ काढत त्यानं थोडं विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला आणि पत्नी नाझरिया नाझीमबरोबर काही वेळ घालवला आहे. नाझरिया ही अभिनेत्री आणि निर्माती आहे, तिनं समुद्राच्या बीचवरील त्यांचे काही सुंदर फोटो शेअर केले आहेत.

Nazriya Asks Fahadh Faasil to 'Chill'
पत्नी नाझरियाने फहाद फासिलला दिला 'चिल' राहण्याचा सल्ला

नझरिया आणि फहाद यांना सध्या आकाश ठेंगणं वाटू लागलंय. त्यांचा अलीकडील 'आवेशम' हा चित्रपट 2024 चा चौथा सर्वाधिक कमाई करणारा मल्याळम चित्रपट बनला आहे. या दोघांनी त्यांच्या चित्रपटाच्या यशानंतर सुंदर समुद्रकिनाऱ्यावर सहलीचा आनंद घेतल्याचं फोटोतून दिसत आहे. नाझरियाने सोशल मीडियावर तिचा आणि तिचा पती फहादचा एक छान फोटो शेअर केला आहे. सेल्फीमध्ये, हे जोडपे त्यांच्या स्विमवेअर आणि सनग्लासेसमध्ये दिसत आहे. नाझरियाने फोटोला कॅप्शन देत लिहिले: "लेट्स चिल बेबी".

दैनंदिन चिंतेतून आणि कामाच्या रगाड्यातून दोघांनीही ब्रेक घेतला आणि समुद्र किनारा गाठला. या जोडप्यावर प्रेम करणारे अमाप चाहते आहेत. या जोडप्याबद्दलचे त्यांचे प्रेम व्यक्त करण्यासाठी तसेच 'आवेशम' चित्रपटातील पंच लाइन पोस्ट करण्यासाठी चाहत्यांनी कमेंट सेक्शन भरुन टाकलं आहे. नाझरियाने तिच्या अकाऊंटवर सेल्फी आणि तिच्या स्टोरी सेक्शनमध्ये समुद्रकिनाऱ्यावरील फोटोंची स्ट्रिंग पोस्ट केली.

फहाद फासिलने 'आवेशम' या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली असून त्याची पत्नी नाझरियासह 'फहाद फासिल आणि फ्रेंड्स' या लेबलखाली त्याची सह-निर्मिती केली आहे. जितू माधवन दिग्दर्शित हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चमकत आहे, प्रेक्षक आणि समीक्षक दोघांकडून प्रशंसा मिळवत आहे. 'आवेशम' ही तीन किशोरवयीन मुलांची एक मनोरंजक कथा आहे जे अभियांत्रिकी पदवीसाठी बंगळुरूला जातात. तिथं त्यांची गाठ 'रंगा' नावाच्या स्थानिक ठगाशी पडते आणि ते त्याची मदत घेतात. ही रंगा नावाची व्यक्तीरेखा फहाद फसिलने साकारली आहे. त्याच्या पात्राची खूप मोठी चर्चा सध्या सुरू आहे.

हेही वाचा -

  1. भारतीय चित्रपटांचे जनक दादासाहेब फाळके यांची आज जयंती, 'अशी' केली होती देशातील पहिल्या चित्रपटाची निर्मिती - DADASAHEB PHALKEB BIRTH ANNIVERSARY
  2. प्रभासच्या 'कल्की 2898 एडी'ची तुलना 'ड्युन'शी करणाऱ्यांना नाग अश्विनने दिलं उत्तर - Kalki 2898 AD
  3. राकेश रोशनचा वयाच्या 74 व्या वर्षीही फिटनेस उत्साह पाहून तुम्हीही व्हाल चकित - Rakesh Rsohan Fitness

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.