मुंबई : साऊथ अभिनेत्री नयनतारानं नेटफ्लिक्स डॉक्युमेंटरीमध्ये 'नानुम राउडी धान'मधील बीटीएस क्लिप वापरल्याबद्दल धनुषबरोबरच्या कायदेशीर वादावर एक खुलसा केला आहे. नयनताराचा माहितीपट 'नयनतारा: बियॉन्ड द फेयरीटेल' हा काही दिवसापूर्वी खूप चर्चेत आला होता. एका मुलाखतीत लेडी सुपरस्टार नयनतारानं धनुषबरोबरच्या वादाबद्दल सांगितलं की, माझा पती दिग्दर्शक विघ्नेश शिवन यांनी 'नानुम राउडी धान'मधील काही दृष्य घेण्यासाठी निर्माता धनुषशी संपर्क साधला होता, मात्र धनुषनं यासाठी नकार दिला. यानंतर आम्ही पुढं गेलो.'
नयनताराची मुलाखत : पुढं तिनं सांगितलं, 'साहस हे सत्यातूनच येत असते. जेव्हा मी काही चुकीचे करत नाही, तेव्हा मला काही घाबरण्याचे कारण नाही. आता जर मी आवाज उठवला नाही, तर भविष्यात कोणीही बोलण्याची हिंमत करू शकणार नाही. मला फक्त प्रमोशनसाठी कोणाचेही नाव खराब करायचे नाही. हा माझ्यासाठी योग्य मुद्दा होता. 'नानुम राउडी धान' या चित्रपटाचं दिग्दर्शन नयनताराचा पती विघ्नेश शिवननं केलं आहे. या चित्रपटामध्ये लेडी सुपरस्टार ही मुख्य भूमिकेत दिसली होती. याशिवाय 'नानुम राउडी धान'मध्ये साऊथ अभिनेता विजय सेतुपती देखील होता. या चित्रपटाची निर्मिती धनुषनं केली होती.
#Nayanthara about issue with #Dhanush in today's interview😯
— Cine Devilz🎥 (@LuvSarfraz) December 11, 2024
We never did as PR for the film. Wanted to use 4 lines, we reached out as a friend to Dhanush but didn't work. Want to clear the issue so that be friends. BTS footage was not part of contract" #VigneshShivN #IdlyKadai pic.twitter.com/Q6Wiw3Q0sj
नयनतारा दिलं स्पष्टीकरण : नयनतारानं धनुषशी कधीच खुलेपणाने संवाद साधला नव्हता. मात्र यावेळी 'नानुम राउडी धान'मधील बीटीएस क्लिपबाबत धनुषच्या व्यवस्थापकाशी संपर्क तिनं केला होता. यानंतर तिनं धनुषशी फोनवर बोलण्याची संधी देण्याची विनंती केली होती. दरम्यान नयनतारा पुढं म्हटलं, 'गेल्या दहा वर्षात जे काही चुकलं, त्याबद्दल मला बोलायचं नव्हते, तर भविष्यात कुठल्यातरी समारंभात दोघांमध्ये हलकीशी 'हाय' तरी भेट व्हावी, अशी माझी इच्छा होती.' नयनतारानं या मुलाखतीत असंही उघड केलं की, डॉक्युमेंटरीमध्ये वापरलेले काही फुटेज हे पडद्यामागील शॉट होते, जे एका क्रू सदस्यानं घेतले होते. नयनतारा आणि धनुष हे अनेक दिवसांपासून बोलत नाही. 18 नोव्हेंबर रोजी 'नयनतारा: बियॉन्ड द फेयरीटेल' हा चित्रपट ' नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला होता. यापूर्वी धनुषनं त्याच्या माहितीपटामधील बीटीएस क्लिप वापरल्याबद्दल नयनताराला कायदेशीर नोटीस पाठवली होती. यानंतर नयनतारानं धनुषविरोधात निषेध पत्र सोशल मीडियावर लिहिले होतं. याशिवाय नयनतारानं या मुलाखतीत हे स्पष्ट केलं की, धनुषला पत्र लिहिणं हा तिचा पब्लिसिटी स्टंट नव्हता. नयनतारानं या मुलाखतीतून आपल्या मनात सुरू असलेल्या गोष्टी देखील शेअर केल्या आहेत.
हेही वाचा :