ETV Bharat / entertainment

'बिग बॉस 18' मधून मुस्कान बेघर, अविनाश आणि करणवीरचा सलमाननं घेतला क्लास

'बिग बॉस 18' मधून मुस्कान बामणे बेघर झाली असून सलमाननं अविनाश मिश्रा आणि करणवीरला सुनावलं आहे. चाहत आणि अविनाशची आई घरामध्ये आल्याचं प्रोमोत दिसत आहे.

Big Boss 18
बिग बॉस 18 (Big Boss 18 team)
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : Oct 26, 2024, 9:56 AM IST

मुंबई - 'बिग बॉस'मधून बाहेर पडणाऱ्यांच्या नॉमिनेशन यादीत मुस्कान बामणे, तजिंदर सिंग आणि चाहत पांडे या तिघांची नावं होती. बिग बॉसनं स्पर्धकांना एकत्र केलं आणि कोण बाहेर गेलं पाहिजे याबद्दल विचारलं. मग करणवीरनं मुस्कान लॉस्ट असल्याचं सांगत तिचं नाव घेतलं, अॅलिस, तेजिंदर आणि चाहतनंही मुस्कानचं नाव घेतलं. जास्तीत जास्त स्पर्धकांनी ज्याचं नाव घेतलं त्याला बाहेर पडाव लागतं, त्यानुसार मुस्कानला बिग बॉस हाऊसमधून बेघर व्हावं लागलं. मुस्कान बाहेर पडल्यानं प्रेक्षकांमध्ये समाधान पसरल्याचं दिसतंय. अनेकांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया देताना "मुस्कान बाहेर पडली ते बरं झालं. तशीही ती बिग बॉसच्या घरात सक्रिय दिसत नव्हती. तिच्यासाठी हा शो नव्हताच", अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत.

सलमान खाननं घेतला करणवीर आणि अविनाश मिश्राचा क्लास

'बिग बॉस 18' च्या आगामी भागात अनेक घडामोडी घडताना दिसतील, शोचा नवीन प्रोमोमधून हे दिसत आहे. यामध्ये सलमान खान शोमध्ये येताच तो अविनाश मिश्रा आणि करणवीर मेहराला शिव्या देताना दिसतो. करणवीरला तो घरचा जावई आहेस का असं विचारतो. चाहत पांडे आणि अविनाश मिश्रा यांची आई देखील शोमध्ये आल्याचं प्रोमोत दिसत आहे.

'बिग बॉस 18' च्या वीकेंड का वार एपिसोडमध्ये सलमान खान रागात असल्याचं दिसत आहे. नवीन प्रोमोमध्ये सलमानने अविनाशच्या घरातील वृत्तीवर प्रश्न उपस्थित केले. 'तू या घराचा देव आहेस का? सरळ पुढे जाणे आणि असभ्य असणे यात एक छोटीशी सीमारेषा आहे, तू ती रेषा ओलांडली आहे. तुझे नाव अविनाश आहे पण तू स्वतःचा नाश करशील, असं सलमान म्हणाला.

यानंतर सलमान खान करणवीर मेहराशीही बोलतो. तो त्याला सांगतो की त्यांच्या विचित्र वागण्यामुळेच त्यांचे घरातील किंवा बाहेरचे नाते टिकू शकले नाही. सलमान म्हणतो, 'तुझ्या आयुष्यात दुःख आहे. तू बाहेरही कुटुंब निर्माण करू शकला नाही, आणि इथेही तुला जमलं नाही. जे काही करायचं ते लपून छपून न करता उघड कर, असा सल्लाही सलमाननं करणवीरला दिला.

सिंघम आणि चुलबूल पांडेची बिग बॉसमध्ये जोडी

या एपिसोडमध्ये बॉलिवूड स्टार अजय देवगण देखील दिसणार आहे. त्याच्या आगामी 'सिंघम अगेन' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी तो बिग बॉसच्या घरात येणार आहे. अजय देवगण बरोबर सलमान खानची मस्ती स्टेजवर पाहायला मिळणार आहे. ते दोघेही एकत्र स्पर्धकांची शाळा घेऊ शकता

शोमध्ये आली अविनाश मिश्रा आणि चाहत पांडेची आई

प्रोमोमध्ये अविनाश मिश्रा आणि चाहत पांडे यांच्यातील संभाषण देखील दाखवण्यात आलं आहे. यामध्ये दोघांच्या आई देखील एपिसोडमध्ये दिसतात. अविनाशच्या मागील कमेंटमध्ये, त्यानं चाहतला असंस्कृत म्हटलं होतं आणि तिच्याबद्दल काही आक्षेपार्ह गोष्टी देखील बोलल्या होत्या, ज्यामुळे घरात तणाव निर्माण झाला होता. याबद्दल दोघांच्याही आई त्यांच्याशी संवाद साधायला आल्या आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.