नवी दिल्ली - 70 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्याचा बक्षीस वितरण समारंभ आज दिल्लीतील विज्ञान भवनमध्ये पार पडला. भारतीय चित्रपटात्या वेगवेगळ्या क्षेत्रात सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या प्रतिभावंतांचा आज पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी संगीतकार प्रीतम आणि एआर रहमान यांना राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.
🏆 70th National Film Awards 🏆
— PIB India (@PIB_India) October 8, 2024
Legendary Music Composer @arrahman receives the #NationalFilmAward from President Droupadi Murmu for Best Music Direction in film 'Ponniyin Selvan - Part I'#70thNationalFilmAwards pic.twitter.com/JBX7S4IKkh
अकादमी पुरस्कार विजेते संगीतकार ए आर रहमान यांनी सर्वोत्तम संगीत दिग्दर्शकाचा सातवा राष्ट्रीय पुरस्कार आज प्राप्त केला. नवी दिल्लीत पार पडलेल्या ७० व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये मणिरत्नम यांच्या तमिळ ब्लॉकबस्टर, पोन्नियिन सेल्वन भाग १ या चित्रपटाच्या बॅग्राऊंड स्कोअरसाठी त्यांना हा पुरस्कार मिळाला.
🏆70th National Film Awards🏆
— PIB India (@PIB_India) October 8, 2024
President Droupadi Murmu confers National Award to Music Director, Pritam for 'Best Music Direction' in 'BRAHMASTRA-PART 1: SHIVA'#70thNationalFilmAwards #NationalFilmAwards pic.twitter.com/7dXLkLbpbU
पुरस्कार मिळाल्यावर, रहमानने एएनआयला दिलेल्या मुलाखतीत त्याच्या भावना शेअर केल्या आहेत. "हा पुरस्कार विशेष आहे कारण हा माझा सातवा राष्ट्रीय पुरस्कार आहे. माझा पहिला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मणिरत्नम यांच्या 'रोजा' या चित्रपटासाठी होता. हा चित्रपटही त्यांच्याबरोबर आहे. मी जेव्हा जेव्हा त्यांच्यासोबत काम करतो तेव्हा तो खूप खास असतो, त्याला सर्वोत्कृष्ट पुरस्कार मिळतो. आपल्या सर्वांपैकी आणि हा राष्ट्रीय पुरस्कार असल्याने मला त्याचा खरोखर अभिमान आहे,” असं एआर रहमान एएनआयशी बोलताना म्हणाले. मणिरत्नम दिग्दर्शित या चित्रपटात दक्षिणेतील कलाकार विक्रम, त्रिशा कृष्णन कार्तिक शिवकुमार, जयम रवी आणि ऐश्वर्या राय बच्चन यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
70th National Film Awards📽️🎬✨
— PIB India (@PIB_India) October 8, 2024
Music director A.R. Rahman (@arrahman) and Pritam (@ipritamofficial) conferred with 'Best Music Direction' award for film 'Ponniyin Selvan-Part I' and Brahmastra-Part 1: Shiva' respectively, at the 70th #NationalFilmAwards… pic.twitter.com/Vm21ehoyHe
भारतातील कोणत्याही संगीत दिग्दर्शकाने जिंकलेल्या सर्वाधिक पुरस्कारांचा हा नवा विक्रम आहे. रहमानने इसगानानी इलैयाराजा यांना मागे टाकले आहे, ज्यांच्याकडे त्याच्या श्रेयासाठी पाच राष्ट्रीय पुरस्कार आहेत, ज्यातील सर्वात अलीकडील त्याला 2015 मध्ये तामिळ चित्रपट थाराई थप्पट्टाईसाठी मिळाले होते. चार राष्ट्रीय पुरस्कारांसह विशाल भारद्वाज तिसऱ्या क्रमांकावर आहे.