मुंबई - अभिनेता सलमान खाननंतर नुकतेच शाहरुख खानला जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या. यानंतर मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. धमकी प्रकरणी छत्तीसगडच्या रायपूर येथून एका संशयित व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. सध्या बॉलिवूडमध्ये स्टार्सना सतत धमक्या येत आहेत. सलमान खान सध्या लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या निशाणावर आहे. दरम्यान, शाहरुख खानलाही जीवे मारण्याच्या धमकी आल्यानंतर आता बॉलिवूडमध्ये अनेकजण घाबरून आहेत. याप्रकरणी पोलिसात नोंद करण्यात आली आहे. आता मुंबई पोलिसांना धमकी प्रकरणी संशयित व्यक्तीची चौकशी सुरू केली आहे.
शाहरुखला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीला अटक : मिळालेल्या माहितीनुसार, व्यक्तीच्या अटकेबाबत मुंबई पोलिसांनी सांगितलं की, शाहरुख खानला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपीचं नाव मोहम्मद फैजान असून तो एक वकिल आहे. या वकिलानं शाहरुख खानकडून 50 लाख रुपयांची मागणी केल्याचा आरोप आहे. या आरोपीला रायपूर, छत्तीसगड येथून ताब्यात घेतलं आहे. शाहरुख खानला मिळालेल्या धमकीची माहिती वांद्रे पोलिसांना मिळाली होती. पोलीस ठाण्यातच एक फोन आल्याचे सांगण्यात आलंय. 5 नोव्हेंबर रोजी वांद्रे पोलिस स्टेशनच्या नंबरवर एक फोन आला आणि आरोपीनं यात म्हटलं "तो बँडस्टँडचा शाहरुख आहे, त्याला 50 लाख द्याला लावा नाहीतर मी त्याला मारून टाकेन." ती व्यक्ती कोण बोलत आहे, असं पोलिसांनी विचारलं असता त्यानं सांगितलं की, "काही फरक पडत नाही, माझे नाव हिंदुस्थानी लिहा."
शाहरुख खानला वाय प्लस सुरक्षा : यानंतर मुंबई पोलिसांनी तात्काळ कारवाई केली. हा क्रमांक छत्तीसगडमधील फैजान या व्यक्तीच्या नावानं नोंदणीकृत असल्याचं पोलिसांना समजलं. यानंतर या व्यक्तीशी बोलले, तेव्हा या घटनेच्या तीन दिवस आधी म्हणजे 2 नोव्हेंबर रोजी त्याचा फोन चोरीला गेल्याचे समोर आले होते. त्याचा फोन शोधून देखील मिळू शकला नाही. याशिवाय या व्यक्तीनं रायपूरमध्ये फोन चोरीची तक्रारही नोंदवली होती. तसेच फैजानचा फोन काही दिवसांपूर्वी हरवला होता. याबाबत त्यानं देखील माहिती दिली आहे. शाहरुख खानला पहिल्यांदाच धमकी मिळाली आहे असं नाही. तो नेहमीच अंडरवर्ल्डच्या हिटलिस्टमध्ये असतो. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्येही 'पठाण' आणि 'जवान' चित्रपटांच्या यशानंतर त्याला सतत जीवे मारण्याच्या धमक्या येत होत्या. शाहरुखला आता वाय प्लस सुरक्षा देण्यात आली आहे. पोलिसांनी मोहम्मद फैजानविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 308 (4) (जीवे मारण्याची धमकी देऊन खंडणी) आणि 351 (3) (4) (गुन्हेगारी कट) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
हेही वाचा :