ETV Bharat / entertainment

करण जोहरला दिलासा; 'शादी के डायरेक्टर करण और जोहर' चित्रपटाच्या प्रदर्शनाला मुंबई उच्च न्यायालयाची स्थगिती - Karan Johar - KARAN JOHAR

Karan Johar : 'शादी के डायरेक्टर करण और जोहर' या शुक्रवारी प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटाला मुंबई उच्च न्यायालयानं 10 जुलैपर्यंत स्थगिती दिलीय. प्रसिध्द चित्रपट निर्माते-दिग्दर्शक करण जोहर यांनी या चित्रपटामध्ये त्यांचं नाव विनापरवानगी वापरण्याला आक्षेप घेत मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

Karan Johar
करण जोहर (Etv Bharat MH DESK)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 13, 2024, 7:26 PM IST

Updated : Jun 13, 2024, 8:02 PM IST

मुंबई Karan Johar : प्रसिद्ध दिग्दर्शक-निर्माता करण जोहर याच्यावर आधारित 'शादी के डायरेक्टर करण और जोहर' हा सिनेमा तयार आहे. या सिनेमा विरोधात त्याने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. सिनेमाच्या नावात आणि कथेत आपल्या नावाचा चुकीचा वापर केल्याचा आरोप करणने केलाय. 14 जूनला सिनेमा रिलीज होत असल्यानं गुरुवारी तातडीनं त्यावर सुनावणी झाली. मुंबई उच्च न्यायालयानं 10 जुलैपर्यंत चित्रपटाला स्थगिती दिली आहे.

न्यायालयानं दिला अंतरिम आदेश : न्यायमूर्ती रिजाय छागला यांच्यापुढे गुरुवारी झालेल्या सुनावणीत न्या. छागला यांनी हा निर्णय दिला. करण जोहरतर्फे ज्येष्ठ वकील अ‍ॅड. झाल अंध्यारुजीना यांनी युक्तीवाद केला. यावेळी डीएसके लीगलचे अ‍ॅड. पराग कंधार, अ‍ॅड. रश्मीन खांडेका, अ‍ॅड. चंद्रिमा मित्रा, अ‍ॅड. प्रणिता साबू, अ‍ॅड. अनाहिता वर्मा उपस्थित होते. न्यायमूर्ती छागला यांनी निर्मात्यांना करण जोहरचं नाव एकत्र किंवा काही भागांमध्ये, चित्रपटाच्या शीर्षकात किंवा जाहिरातींमध्ये वापरण्यापासून रोखणारा अंतरिम आदेश दिलाय.

जोहरच्या मुलभूत हक्कांचे उल्लंघन : या चित्रपटामुळं करण जोहरच्या मुलभूत हक्कांचं उल्लंघन होत असून त्याच्या प्रतिमेवर विपरीत परिणाम होत असल्याचं सकृतदर्शनी दिसून येतय असं निरीक्षण न्या. छागला यांनी नोंदवलं. करण जोहर यांच्यातर्फे इंडिया प्राईड अ‍ॅडव्हाजरी, संजय सिंग आणि बबलू सिंग यांच्याविरोधात दावा दाखल केला होता. या चित्रपटाच्या निर्मात्यांना गरज भासल्यास अंतरीम आदेशात फेरबदल करण्यासाठी परवानगी देण्यात आलीय.

न्यायालयाने दिले निर्देश : सेलिब्रिटी व्यक्तिमत्व असलेल्या करण जोहरच्या व्यक्तिगत हक्कांचं उल्लंघन होत असल्याच्या मुद्द्याकडं अ‍ॅड. अंध्यारुजीना यांनी न्यायालयाचं लक्ष वेधलं. करण जोहरचं नाव चित्रपटाच्या जाहिरातीसाठी किंवा कोणत्याही प्रकारे वापरलं जावू नये असे स्पष्ट निर्देश न्यायालयाने यावेळी दिले. हे नाव वापरण्यामध्ये करण जोहरच्या नावाचा लाभ घेण्याचा स्पष्ट हेतू दिसून येत असल्याचं प्रथमदर्शनी दिसत असल्याचं न्यायालयानं स्पष्ट केलंय. ज्यांनी हा चित्रपट बनवला आहे ते करण जोहर यांच्याप्रमाणेच चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यामुळं त्यांना ब्रॅंडचं काय महत्त्व असतं ते माहीत आहे, असं मत न्यायालयानं नोंदवलं आहे.

प्रसिध्दीचा लाभ घेण्याचा प्रयत्न : जोहरच्या वकीलांनी यावेळी मद्रास उच्च न्यायालयाच्या शिवाजीराव गायकवाड यांच्या निकालाचा संदर्भ दिला. तसंच अभिनेता अनिल कपूर आणि माजी मंत्री अरुण जेटली यांच्याप्रकरणी न्यायालयांनी दिलेल्या निकालाचा संदर्भ दिला. करण जोहरने अनेक बॉलीवूड ब्लॉकबस्टर चित्रपट निर्माण केले आहेत. त्याच्या प्रसिध्दीचा लाभ मिळवण्यासाठी केलेला हा प्रयत्न आहे, असं निरीक्षण यावेळी न्यायालयाने नोंदवलं. केवळ करण जोहर नाव न वापरता डायरेक्टर हा शब्द त्याच्या मागे जोडून वापरणं हा स्पष्टपणे त्याचा या चित्रपटाशी संबंध आहे, असा गैरसमज सामान्य नागरिकांमध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न दिसत असल्याचं न्यायालयानं म्हटलंय.

हेही वाचा -

  1. 'शादी के डायरेक्टर करण और जोहर' या सिनेमा विरोधात याचिका, करणकडून बदनामीचा आरोप
  2. "एक था राजा, एक थी रानी, जात अलग थी...खतम कहानी" : 'धडक 2' ची अधिकृत घोषणा - Dhadak 2 Announced
  3. करण जोहरचा ५२ वा वाढदिवस : बॉलिवूड स्टार घडवणाऱ्या करणचे आगामी प्रोजेक्ट आणि टॉप 5 चित्रपट - Karan Johars Birthday

Last Updated : Jun 13, 2024, 8:02 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.