ETV Bharat / entertainment

मुंबईतील होर्डिंग अपघातात कार्तिक आर्यनच्या मामा-मामीचा मृत्यू, अंत्यसंस्काराला कार्तिकची हजेरी - Mumbai billboard crash - MUMBAI BILLBOARD CRASH

Mumbai billboard crash: मुंबईत नुकत्याच झालेल्या वादळात घाटकोपरमध्ये एक उंच होर्डिंग कोसळले होते, ज्यामध्ये 16 लोकांचा मृत्यू झाला होता आणि त्यात कार्तिक आर्यनचे मामा आणि मामा यांचाही समावेश होता.

Mumbai billboard crash
कार्तिक आर्यन (Karthik Aaryan Instagram)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 17, 2024, 3:39 PM IST

मुंबई - Mumbai billboard crash: 'चंदू चॅम्पियन' चित्रपटामुळे चर्चेत असलेला अभिनेता कार्तिक आर्यनवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या चित्रपटाचा ट्रेलर उद्या म्हणजेच १८ मे रोजी प्रदर्शित होणार आहे आणि त्याआधी कार्तिकच्या आयुष्यात मोठं वादळ नि्माण झालं आहे. खरंतर नुकतंच मुंबईत वादळ आलं होतं, त्यात रस्त्यावरील एक मोठे होर्डिंग पडले. या अपघातात अनेक जण जखमी झाले असून 16 जणांना रस्त्यावरच आपला जीव गमवावा लागला आहे. आता बातमी आली आहे की, कार्तिकने मुंबईच्या होर्डिंग दुर्घटनेत त्याचे मामा आणि मामी गमावले आहेत.

56 तासांनंतर सापडले मृतदेह

ही घटना 13 मे रोजी मुंबईतील घाटकोपर परिसरात घडली. 56 तासांनंतर कार्तिकच्या मामा आणि मामीचे मृतदेह सापडले. विशेष म्हणजे त्यांच्या मृतदेहाची ओळख त्यांच्या अंगठीवरुन झाली होती.

कार्तिकचे मामा आणि मामी घरी जात असताना झाला होर्डिंगचा अपघात

अपघातात सेवानिवृत्त हवाई वाहतूक नियंत्रण महाव्यवस्थापक मनोज चांसोरिया (60) आणि त्यांची पत्नी अनिता (59) यांचा मृत्यू झाला आहे. कार्तिकचे मामा आणि मामी असलेलं हे दांपत्य पेट्रोल भरण्यासाठी पेट्रोल पंपावर थांबले होते आणि तिथे हे घातक होर्डिंग लावण्यात आलं होतं. कार्तिकचे मामा आणि मामी मध्य प्रदेशातील त्यांच्या घरी जात असताना हा अपघात झाला.

कार्तिक आर्यन अंत्यसंस्काराला पोहोचला

या होर्डिंगखाली दबून कार्तिकच्या मामा आणि मामीचा अत्यंत वेदनादायी मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांची ओळख त्याच्या चेहऱ्यावरून नाही तर त्याच्या अंगठी आणि कारने झाली. कार्तिक आर्यन त्याच्या काका आणि काकूंच्या अंत्यसंस्कारात सहभागी झाला होता. या अपघातात 74 जण गंभीर जखमी झाले आहेत.

कार्तिक आर्यनच्या 'चंदू चॅम्पियन' या चित्रपटाचा ट्रेलर उद्या म्हणजेच १८ मे रोजी प्रदर्शित होणार आहे आणि चित्रपट १४ जून रोजी प्रदर्शित होणार आहे. कार्तिकच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, तो 'भूल भुलैया 3'मध्ये विद्या बालन आणि तृप्ती दिमरीबरोबर दिसणार आहे. सध्या कार्तिक या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये गुंतला आहे. याआधी या चित्रपटामधील अनेक फोटो सोशल मीडियावर कार्तिक शेअर केले होते. याशिवाय तो 'आशिकी 3' चित्रपटात झळकणार आहे.

हेही वाचा -

1. 'चंदू चॅम्पियन'मध्ये दिसणार सलग 8 मिनिटांच्या सिंगल टेक वॉर सिक्वेन्सची झलक, ट्रेलरची उलटी गिनती सुरू - Chandu Champion trailer

2. रश्मिका मंदान्नाच्या अटल सेतू व्हिडिओची पंतप्रधान मोदींकडून दखल, पेड प्रचाराचा युजर्सकडून आरोप - Rashmika Atal Setu Video

3. कान्स 2024च्या रेड कार्पेटवर ऐश्वर्या राय बच्चनचा जलवा, मुलगी आराध्यानंही जिंकली मनं - Cannes 2024

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.