ETV Bharat / entertainment

अनंत आणि राधिकाच्या लग्नाच्या आधी मुकेश, नीता अंबानी यांनी लावली 50 वंचित जोडप्यांची लग्नं - Mukesh and Nita Ambani - MUKESH AND NITA AMBANI

Ambani Family Hosted A Mass Wedding: मुकेश आणि नीता अंबानी यांनी पालघरमध्ये 50 हून अधिक जोडप्यांसाठी 'सामूहिक विवाह' आयोजित केला होता. या कार्यक्रमाद्वारे अंबानी कुटुंबानं अनंत आणि राधिका यांच्या लग्नाची सुरुवात केली आहे.

Ambani Family Hosted A Mass Wedding
अंबानी कुटुंबाने सामूहिक विवाहसोहळा आयोजित केला (मुकेश अंबानी- (IANS))
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 2, 2024, 7:57 PM IST

मुंबई - Ambani Family Hosted A Mass Wedding : उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट 12 जुलैला विवाह करणार आहेत. अंबानी कुटुंबीयांनी अनंत आणि राधिकाच्या लग्नसोहळ्याला सुरुवात केली आहे. मुकेश आणि नीता अंबानी यांनी 50 जोडप्यांच्या सामूहिक विवाहानं या शुभ कामाची सुरुवात केली. दरम्यान या जोडप्याचा विवाह झाल्यानंतर अंबानी आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी या जोडप्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. रिलायन्स कॉर्पोरेट पार्क येथे हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात सुमारे 800 लोक उपस्थित होते. 'मानवतेची सेवा हीच ईश्वर सेवा' याला अंबानी कुटुंबानं कायम ठेवत हे काम केलंय.

सामूहिक विवाहात हजारो जणांनी घेतला भाग : या जोडप्याला अंबानी कुटुंबाकडून मंगळसूत्र, अंगठ्या आणि नाकातील नथनीसह सोन्याचे काही दागिने भेट देण्यात आले. याशिवाय नवरी मुलींना चांदीचे पैंजण देखील दिली गेली. प्रत्येक वधूला 1.01 लाख रुपयांचा धनादेश 'स्त्रीधन' म्हणून दिलं गेलं. तसंच प्रत्येक जोडप्याला वर्षभर पुरेल एवढा किराणा सामान आणि घरगुती वस्तू भेट दिल्या गेल्या. घरगुती भेट वस्तूंमध्ये भांडी, गॅस शेगडी, मिक्सर, पंखा यांचा समावेश होता. या विवाह सोहळ्याला वधू-वरांचे कुटुंबीय, सामाजिक कार्यकर्ते देखील उपस्थित होते. मुकेश अंबानी, अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटसह अंबानी कुटुंबातील इतर सदस्यांनी सुमारे 51,000 गावकऱ्यांना पारंपारिक गुजराती जेवण दिलं.

'या' दिवशी अनंत आणि राधिकाचा विवाह होईल : रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे ​अध्यक्ष मुकेश अंबानी आणि रिलायन्स फाऊंडेशनच्या अध्यक्षा आणि संस्थापक नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी उद्योगपती वीरेन मर्चंट यांची मुलगी राधिका मर्चंटबरोबर 12 जुलै रोजी मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये विवाह करणार आहेत. या विवाह सोहळ्यात अनेक नामांकित व्यक्ती उपस्थित असणार आहेत. हा विवाह सोहळा तीन दिवस चालणार आहे. विवाहापूर्वी अनंत अंबानी वेगवेगळ्या मंदिरात आर्शीवाद घेण्यासाठी जात असल्याचं सध्या दिसत आहे.

हेही वाचा :

  1. कोल्हापूरच्या तरुणाची कमाल, फॉलोअर्सची नावं लिहिली फोर्ड मस्टैंग कारवर - A person from Kolhapur
  2. रिया चक्रवर्तीनं सुष्मिता सेनजवळ स्वत:च्या चॅट शोमध्ये गोल्ड डिगर असल्याचा केला उल्लेख - rhea chakraborty
  3. 'सिकंदर'च्या शूटिंगचे पहिले शेड्यूल पूर्ण, सेटवरील सलमान खानसह रश्मिका मंदान्नाचे फोटो व्हायरल - SALMAN KHAN RASHMIKA MANDANNA

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.