मुंबई - Anant Ambani and Radhika Merchan : अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाला आता अवघे काही दिवस उरले आहेत. हे जोडपे 15 दिवसांनंतर लग्न करणार आहेत. आता संपूर्ण अंबानी कुटुंब अनंत आणि राधिका यांच्या लग्नाच्या तयारीत व्यग्र आहे. नीता अंबानी आणि मुकेश अंबानी आपल्या लाडक्या मुलाचे लग्न भव्यदिव्य करण्यासाठी कोणतीही कसर सोडत नाहीत. दरम्यान, मुलाच्या लग्नाआधी अंबानी कुटुंबीय महाराष्ट्रातील पालघरमध्ये वंचित जोडप्यांसाठी सामूहिक विवाह आयोजित केला असल्याचं समजत आहे. याबाबत अंबानी कुटुंबाकडून एक कार्डही जारी करण्यात आलं आहे.
अंबानी कुटुंबानं सामूहिक विवाहाचं केलं आयोजन : अनंत आणि राधिका मर्चंट यांच्या तिसऱ्या प्री-वेडिंग सेलिब्रेशनचा एक भाग म्हणून अंबानी कुटुंबानं 2 जुलै रोजी पालघर येथील स्वामी विवेकानंद विद्यामंदिर येथे वंचितांच्या सामूहिक विवाहाचं आयोजन केल्यानंतर आता अनेकजण त्याचे सोशल मीडियावर कौतुक करत आहेत. दरम्यान मुकेश अंबानी आणि त्यांची पत्नी नीता अंबानी या सामूहिक विवाह कार्यक्रमात सहभागी होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. तसेच अंबानी कुटुंबातील इतर सदस्यही या सोहळ्याचा भाग असतील आणि वधू आणि वरांना आशीर्वाद देतील.
'या' दिवशी होईल अनंत आणि राधिकाचा विवाह : अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट 12 जुलैला लग्न करणार आहेत. या जोडप्याचं लग्न जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये तीन दिवस चालणार आहे. या कार्यक्रमाची सुरुवात 12 जुलै रोजी शुभ विवाहानं होईल. यानंतर 13 जुलै रोजी आशीर्वाद सोहळा आणि 14 जुलै रोजी भव्य स्वागत समारंभ होईल. तसेच ड्रेस कोडबद्दल बोलायचं झालं तर या भव्य शाही विवाहासाठी 'इंडियन फॉर्मल' ड्रेस कोड निश्चित करण्यात आला आहे. मंगल उत्सवासाठी म्हणजेच 14 जुलै रोजी रिसेप्शनच्या दिवशी ड्रेस कोड ''इंडियन' पोशाखचं असेल. दरम्यान अनंत आणि राधिकासाठी क्रूझवर नुकतीच एक भव्य पार्टी आयोजित करण्यात आली होती. या पार्टीमधील अनेक फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत.
हेही वाचा :