ETV Bharat / entertainment

मौनी रॉय आणि सूरज नांबियारनं लग्नाच्या दुसऱ्या वाढदिवसाच्यानिमित्त शेअर केला सुंदर फोटो - सूरज नांबियार

Mouni Roy Wedding Anniversary: अभिनेत्री मौनी रॉय आणि तिचा पती सूरज नांबियार आज 27 जानेवारी रोजी लग्नाचा दुसरा वाढदिवस साजरा करत आहेत. या जोडप्यानं सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Mouni Roy Wedding Anniversary
मौनी रॉयच्या लग्नाचा वाढदिवस
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 27, 2024, 2:01 PM IST

मुंबई - Mouni Roy Wedding Anniversary: अभिनेत्री मौनी रॉय आज 27 जानेवारीला तिच्या लग्नाचा दुसरा वाढदिवस साजरा करत आहे. मौनीनं 2022 मध्ये उद्योगपती सूरज नांबियारशी लग्न केलं. आज 27 जानेवारीला मौनी रॉयच्या लग्नाला दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. आपल्या लग्नाचा दुसरा वाढदिवस साजरा करत असलेल्या मौनी रॉयनं तिच्या इंस्टाग्राम पेजवर काही फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोमध्ये हे जोडपे लग्नाचे काही विधी करताना दिसत आहेत. याशिवाय काही फोटोत दोघंही सुखी संसाराचा आनंद घेताना दिसत आहेत. मौनीच्या या फोटोवर तिचे अनेक चाहते तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करताना दिसत आहेत.

मौनी आणि सूरजनं दिल्या शुभेच्छा : हे फोटो शेअर करताना मौनी रॉयनं कॅप्शनमध्ये लिहिलं, ''लग्नाचे दोन वर्षे, 730 दिवसांच्या असंख्य आठवणी, 63,072,000 सेकंद माझे बोलणे तू ऐकत आहेस, हॅपी एनिवर्सरी बेबी'. दरम्यान सूरजनेही हीच पोस्ट आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केली आहे आणि पत्नी मौनी रॉयला शुभेच्छा दिल्या आहेत. या जोडप्याच्या लग्नामधील फोटो खूप सुंदर आहेत. पोस्ट केलेल्या पहिल्या फोटोत मौनी आणि सूरज एकमेकांकडे पाहून हसताना दिसत आहे. दुसऱ्या फोटोत सूरज मौनी हा लग्नामधील विधी करताना दिसत आहे. त्याचे हे फोटो चाहताना खूप आवडले आहेत.

सेलिब्रिटींनीही शुभेच्छा दिल्या : मौनी-सूरजच्या लग्नाच्या दुसऱ्या वाढदिवसाच्यानिमित्त हिंदी चित्रपटसृष्टीतील टायगर श्रॉफ, दिशा पटानी, सोनम बाजवा, नुपूर सॅनन, सोफी चौधरी, भाजप नेत्या आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी या कलाकारांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान मौनी ही सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. अनेकदा ती तिचे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. मौनी रॉयच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं, तर ती शेवटी 'बोले चूडियाँ'मध्ये दिसली होती. आता पुढं ती 'द व्हर्जिन ट्री'मध्ये सनी सिंग आणि पलक तिवारीसोबत दिसणार आहे. या चित्रपटाचा निर्माता हा संजय दत्त आहे. 'द व्हर्जिन ट्री' चित्रपटाचं दिग्दर्शन सिद्धांत सचदेव हे करत आहेत.

हेही वाचा :

  1. रणबीर कपूर स्टारर 'अ‍ॅनिमल' ओटीटी प्लॅटफॉर्मवर 'या' दिवशी होणार प्रदर्शित
  2. मृणाल ठाकूरनं हिंदी चित्रपटसृष्टीत रोमँटिक चित्रपट न मिळाल्याबद्दल केलं दु:ख व्यक्त
  3. बिग बॉस 17'चा ग्रँड फिनाले 'या' दिवशी होईल, जाणून घ्या तारीख

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.