मुंबई - Krystyna Pyszkova : भारतातील मुंबई येथे नुकतीच 71वी मिस वर्ल्ड पेजेंट स्पर्धा 2024चा फिनाले पार पडला. ज्यामध्ये चेक गणराज्यच्या क्रिस्टिना पिस्कोव्हानं 71व्या मिस वर्ल्ड स्पर्धेचे विजेतेपद पटकावलं आहे. नुकत्याच एका मुलाखतीत क्रिस्टीनानं हिंदी चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार शाहरुख खानच्या 'कभी खुशी कभी गम' चित्रपटातील 'लैजा-लैजा' गाणं आवडत असल्याचं सांगितलं आहे. याशिवाय तिनं भारताविषयी असणार प्रेम देखील यावेळी प्रगट केलं. माजी मिस वर्ल्ड प्रियांका चोप्रा ही नेहमीच तिची इंस्पिरेशन असल्याचं तिनं सांगितलं. मिस वर्ल्ड 2024चा खिताब जिंकल्यानंतर, क्रिस्टीना पिस्कोव्हानं भारतीय चित्रपट आणि कलाकारांबद्दल आदर असल्याचं सांगितलं.
क्रिस्टिना पिस्कोव्हानं शेअर केला भारतामधील अनुभव : क्रिस्टिना पिस्कोव्हाला ती किंग खानची फॅन आहे का? असं विचारले असता तिनं म्हटलं, ''होय मी शाहरुख खानची फॅन आहे.'' या मुलाखतीत क्रिस्टीनानं आपल्या भारत भेटीचाही उल्लेख केला. तिनं म्हटलं, ''मला भारतीयांकडून खूप प्रेम मिळाले आहे. सर्व लोकांकडून मिळालेल्या मदतीबद्दल आणि त्यांनी केलेल्या कौतुकबद्दल मी आभार मानते. याशिवाय तिनं भारतीय खाद्यपदार्थ, विशेषत: बटर चिकन आवडत असल्याचं सांगितलं. क्रिस्टीनानं पुढं म्हटलं की, भारतात राहत असताना, तिनं दररोज आनंद घेतला.''
71वी मिस वर्ल्ड पेजेंट स्पर्धा : मिस वर्ल्ड क्रिस्टीनानं 110 हून अधिक देशांतील स्पर्धकांना पराभूत करून आपल्या नावावर मिस वर्ल्डचं ताज केला आहे. याशिवाय ती सामाजसेविका देखील आहे. क्रिस्टीनाला बासरी आणि व्हायोलिन वाजवायला आवडते. दरम्यान मिस वर्ल्ड स्पर्धेत 12 ज्यूरीच्या पॅनेल होत, ज्यामध्ये चित्रपट निर्माते साजिद नाडियादवाला, अभिनेत्री क्रिती सेनॉन, पूजा हेगडे, माजी क्रिकेटपटू हरभजन सिंग, सामाजिक कार्यकर्त्या अमृता फडणवीस, इंडिया टीव्हीचे अध्यक्ष आणि मुख्य संपादक रजत शर्मा आणि इतर काही मान्यवर होते. 71वी मिस वर्ल्ड पेजेंट स्पर्धा 2024चा फिनालेचं सूत्रसंचालन चित्रपट निर्माता करण जोहर आणि माजी मिस वर्ल्ड 2013 मेगन यंग (फिलिपिन्स) यांनी केलं होतं.
हेही वाचा :