मुंबई - Mirzapur Season 3 Trailer : 'मिर्झापूर 3'ची नुकतीच पोस्टरसह घोषणा करण्यात आली आणि तेव्हापासून अनेकजण या वेब सीरीजच्या रिलीजची प्रतीक्षात करत आहेत. ही वेब सीरीज 5 जुलै रोजी रिलीज होणार आहे. याआधी या क्राईम थ्रिलर सीरिजच्या ट्रेलरची रिलीजची डेट समोर आली आहे. मिर्झापूर सीझन 3'चा ट्रेलर 20 जूनला रिलीज होणार असल्याचं समजत आहे. निर्मात्यांनी याची घोषणा केली नसली तरी 'मिर्झापूर सीझन 3'च्या ट्रेलरची ही रिलीज डेट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 'मिर्झापूर 3'च्या ट्रेलरमध्ये एक मोठा धक्कादायक खुलासा होणार असल्याचं बोललं जात आहे. 'मिर्झापूर सीझन 3' ॲमेझॉन प्राइमवर रिलीज होणार असून ही वेब सीरीज धमाका करेल असं सध्या दिसत आहे.
चाहत्यांनी केली मुन्ना भैय्याची आठवण : सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या पोस्टरच्या पोस्टमध्ये काही चाहते पोस्ट करू आपल्या प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. यामध्ये एका चाहत्यानं लिहिलं, "मुन्ना भैय्याला यावं लागेल कारण तो अमर होता." दुसऱ्या एका चाहत्यानं या पोस्टवर लिहिलं, "मुन्ना भैयाशिवाय 'मिर्झापूर' कंटाळवाणं आहे." आणखी एकानं लिहिलं, "मुन्ना भैया नाही तर मी ही सीरीज बघणार नाही." याशिवाय काहीजण पोस्टवर 'मिर्झापूर 3'साठी उत्सुक असल्याचं सांगत आहेत. 'मिर्झापूर'मध्ये दिव्येंदु शर्मानं मुन्ना भैय्याची भूमिका साकारली होती. ही भूमिका खूप लोकप्रिय झाली होती. आता सोशल मीडियावर अनेकजण मुन्ना भैय्याची आठवण करताना दिसत आहेत.
'मिर्झापूर 3'ची स्टारकास्ट : 'मिर्झापूर 3'मध्ये यावेळी काही नवीन चेहरे पाहिला मिळणार आहेत. या सीरीजमध्ये पंकज त्रिपाठी, रसिका दुग्गल, अली फजल, श्वेता त्रिपाठी, हर्षिता गौर आणि विजय वर्मा हे पुन्हा एकदा त्यांच्या दमदार शैलीत धमाल करताना दिसणार आहेत. 'मिर्झापूर' ही करण अंशुमन दिग्दर्शित अॅक्शन आणि थरारक वेब सीरीज आहे. ही वेब सीरीज 2018 मध्ये प्रदर्शन झाली होती. 'मिर्झापूर' सीरीज खूप लोकप्रिय झाली होती. यानंतर या सीरीजचा दुसरा भाग हा 2020 मध्ये रिलीज झाला होता. आता 4 वर्षानंतर 'मिर्झापूर 3' प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे, त्यामुळे अनेकांना या सीरीजकडून खूप अपेक्षा आहेत.
हेही वाचा :
- शरद पवारांनी माझं चुटकीसरशी केलं काम, अशोक सराफरांनी सांगितली 'खास' आठवण... - ashok saraf
- रवीना टंडन विरोधात तक्रार दाखल; तर फेक रोड रेज व्हिडिओ पोस्ट करणाऱ्याला रवीनानं बजावली नोटीस - raveena tandon
- अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा 2' शी होणारी लढत टाळण्यासाठी 'सिंघम अगेन' चित्रपटाची रिलीज तारीख बदलली - Allu Arjun Pushpa 2