ETV Bharat / entertainment

लॉरेन्स बिश्नोईच्या धमकीनंतर मीका सिंगनं दिला सलमान खानला पाठिंबा, यूजर्स चिंतेत - MIKA SINGH

लॉरेन्स बिश्नोईच्या धमकीनंतर गायक मीका सिंगनं सलमान खानला पाठिंबा दिला आहे. आता अनेकजण मीकाबद्दल चिंतेत आहेत.

Mika Singh
मीका सिंग (सलमान खान आणि मीका सिंह (IANS))
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : Oct 22, 2024, 12:51 PM IST

मुंबई: अभिनेता सलमान खान आणि लॉरेन्स बिश्नोई सध्या चर्चेत आहेत. लॉरेन्स बिश्नोई गुजरातच्या साबरमती जेलच्या आतून सलमान खानवर सतत हल्ला करीत आहे. सलमान खानची वाय प्लस सुरक्षा वाढविण्यात आली आहे. दरम्यान, सलमान खान त्याच्या सर्वाधिक लोकप्रिय शो 'बिग बॉस 18'साठी शूटिंग करीत आहे. याशिवाय अनेकांनी सलमान खानला काळवीट शिकार प्रकरणी बिश्नोई समाजाची माफी मागावी असं देखील सांगितलं आहे. तसेच भजन सम्राट अनुप जलोटा यांनी देखील सलमान खाननं माफी मागावी असं म्हटलंय.

अनुप जलोटानं दिला होता सलमान खानला सल्ला : याप्रकरणात अनुप जलोटा यांनी याबद्दल सलमान खानला सल्ला देत सांगितलं होतं की, "मंदिरात जाऊन माफी मागावी, यात अहंकाराची बाब नाही." अनूप जलोटा देखील सलमान खानच्या शो 'बिग बॉस 12'मध्ये स्पर्धक म्हणून दिसले होते. या प्रकरणी सलमान खाननं माफी मागून शांत राहावं, असं अनूप यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं. आता याप्रकरणी प्रसिद्ध गायक मीका सिंगनं एका शोमध्ये सलमान खानला सपोर्ट केला आहे. सलमान खानसाठी त्यानं एक गाणं शोमध्ये म्हटलं आहे.

मीका सिंगनं दिला सलमान खानला पाठिंबा : या शोमध्ये मीकानं म्हटलं, "सलमान खानसाठी एक ओळ म्हणतो, भाई हूं मैं भाई, तू फिक्र ना कर, उसकी मां की उसकी बहन की जो देखे इधर." मीका सिंगनं आपलं गाणं 'गणपत चल दारू ला' म्हणून सलमान खानला पाठिंबा दिला आहे. मीका सिंगचा सलमान खानला सपोर्ट करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सलमान खानच्या चाहत्यांनी मीका सिंगचं खुले समर्थन केलंय. याशिवाय त्याचं कौतुक केलं आहेत. आता चाहत्यांना मीका सिंगबद्दल चिंता देखील वाटत आहे. कारण अनेकजण या व्हिडिओवर असं लिहित आहे की, सलमानला तर वाय प्लस सिक्युरिटी वाचवेल, तुझं रक्षण कोण करेल. दरम्यान लॉरेन्स बिश्नोई टोळीनं अलीकडेच राजकारणी आणि सलमान खानचा जवळचा मित्र बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली होती.

हेही वाचा :

  1. सलमान खानला धमकी देणाऱ्याची टरकली; माफी मागत म्हणाला....
  2. कडक सुरक्षेत 'बिग बॉस'च्या सेटवर पोहोचला सलमान खान, जड अंतःकरणाने म्हणाला, 'मुझे आज आना ही नहीं था'
  3. "त्यानं आजपर्यंत कधी झुरळही मारलं नाही" : सलीम खाननं केली सलमानची पाठराखण

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.