ETV Bharat / entertainment

मेट गाला 2024 मध्ये उर्फी जावेदच्या ड्रेसची जादू, 'या' अभिनेत्रीनं केली कॉपी - Met Gala 2024 - MET GALA 2024

Met Gala 2024: मेट गाला फॅशन इव्हेंटमध्ये, सेलिब्रिटींनी त्यांच्या स्टायलिश आणि अनोख्या पोशाखानं ग्रीन कार्पेटवर आपली उपस्थिती दर्शविली. या कार्यक्रमामध्ये एका मॉडेलचा पोशाख, उर्फी जावेदच्या ड्रेसशी जुळणारा होता. आता सोशल मीडियावर याचे काही फोटो व्हायरल होत आहेत.

Met Gala 2024
मेट गाला 2024 (उर्फी जावेद-अमेलिया ग्रे हैमलिन (Design Photo- @urf7i instagram/@2015smetgala twitter))
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 7, 2024, 2:09 PM IST

मुंबई - Met Gala 2024 : विचित्र ड्रेसिंग सेन्ससाठी प्रसिद्ध असलेली उर्फी जावेद ही नेहमीच चर्चेत असते. ती तिच्या वेगवेगळ्या कल्पनाद्वारे ड्रेस तयार करत असते. दरम्यान मेट गाला 2024 सुरू झाला आहे. आता या कार्यक्रमात उर्फीच्या डिझायनर ड्रेसची कल्पना चोरीला गेली आहे. मॉडेल अमेलिया ग्रे हॅमलिननं यावर्षी मेट गालामध्ये पदार्पण केलं. तिनं या कार्यक्रमात लाइट-अप टेरेरियम ड्रेस परिधान केला. आता तिचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यापूर्वी असाच ड्रेस हा उर्फीनं घातला होता. यानंतर तिनं काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते.

मेट गालामध्ये उर्फीच्या ब्रह्मांड ड्रेसची दिसली झलक : दरम्यान मेट गालामध्ये अमेलिया ग्रे हॅमलिननं असाच ड्रेस घातल्यानंतर आता अनेकजण सोशल मीडियावर उर्फीचे कौतुक करत आहेत. आता अमेलिया ग्रे हॅमलिन आणि उर्फी जावेदच्या युनिव्हर्स ड्रेसशी तुलना केली जात आहे. अमेलियानं मेट गालामध्ये हजेरी लावली असून सध्या हा कार्यक्रम खूप चर्चेत आहे. दरम्यान काही महिन्यांपूर्वी उर्फीनं ब्रह्मांड ड्रेस डिझाइन केला होता. उर्फीनं तिच्या या पोशाखात वेगवेगळे ग्रह लावले होते , हे ग्रह दिव्यांनी हलत होते. हा अनोखा ड्रेसमधील फोटो इंस्टाग्रामवर शेअर करताना तिनं कॅप्शनमध्ये लिहिलं होत, "सेंटर ऑफ द ब्रह्मांड." तिच्या विज्ञान प्रकल्पाच्या ड्रेसची खूप प्रशंसा सोशल मीडियावर झाली होती. तिचा हा ड्रेस अनेकांना आवडला होता.

ग्रीन कार्पेटवर उतरले कलाकार : उर्फीच्या पोस्टच्या काही दिवसानंतर, वोगनं जूनमध्ये रिलीज होणाऱ्या ताकाशाही स्पिंग 2024 अंडरकव्हर टेरॅरियम ड्रेसची एक झलक शेअर केली होती. हा ड्रेस उर्फीच्या थीमशी जुळणारा होता. दरम्यान वोगनं शेअर केलेल्या ड्रेसमध्ये लहान झाडे आणि जिवंत फुलपाखरे होती. मेट गाला 2024 न्यूयॉर्कमधील मेट्रोपॉलिटन म्युझियम ऑफ आर्टमध्ये होत आहे. फॅशनची सर्वात मोठी नाईट-थीम असलेली 'स्लीपिंग ब्युटीज: रीअवेकनिंग फॅशन' मध्ये अनेक स्टार्स त्यांच्या स्टायलिश पोशाखांसह ग्रीन कार्पेटवर शोभून दिसत होते. या कार्यक्रमात आलिया भट्टनं देखील हजेरी लावली आहे. ती दुसऱ्यांदा मेट गाला कार्यक्रमात सामील झाली आहे.

हेही वाचा :

  1. आलिया भट्टचा डीपफेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल, चाहत्यांनी केली नाराजी व्यक्त - Alia Bhatt Deepfake Video
  2. मेट गाला 2024 मध्ये 10 हजार तासात बनलेला साडी गाऊन परिधान केलेल्या ईशा अंबानीचा दबदबा - Met Gala 2024
  3. मेट गालामध्ये आलिया भट्टनं परदेशी भूमीवर फडकवला भारतीय संस्कृतीचा झेंडा, पाहा फोटो - ALIA BHATT MET GALA 2024

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.