मुंबई - Flood Relief in Telangana and AP: आंध्र प्रदेश आणि तेलंगणातील काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. मुसळधार पाऊस आणि पुरामुळे लोकांचे दैनंदिन जनजीवन विस्कळीत झाले आहेत. दोन्ही राज्यांमधील सरकार लोकांसाठी मदत आणि बचाव कार्यात गुंतलेली आहेत. पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले असल्यानं लोकांना घरे सोडून सरकारी आश्रयस्थानी जावे लागत आहे. अशा परिस्थितीमध्ये दाक्षिणात्य अभिनेते पूरग्रस्तांना मदतीचा हात देत आहेत.
తెలుగు రాష్ట్రాల్లో వరద ప్రభావం వల్ల ప్రజలకు కలిగిన, కలుగుతున్న కష్టాలు నన్ను కలిచివేస్తున్నాయి. పదుల సంఖ్యలో అమాయక ప్రాణాలు కోల్పోవడం ఎంతో విషాదకరం. తెలుగు రాష్ట్రాల ముఖ్యమంత్రుల నిర్దేశంలో రెండు ప్రభుత్వాలు శాయశక్తులా పరిస్థితిని మెరుగు పరచడానికి కృషి చేస్తున్నాయి.
— Chiranjeevi Konidela (@KChiruTweets) September 4, 2024
మనందరం ఏదో…
आंध्र प्रदेश आणि तेलंगणाला पूराचा फटका बसला असताना टॉलिवूड स्टार्स दोन्ही राज्यांच्या सरकारांना मदत करत आहेत. यापूर्वी, 'कल्की 2898 एडी'च्या निर्मात्यांनी आणि साऊथ सुपरस्टार ज्युनियर एनटीआरनं मुख्यमंत्री मदत निधीमध्ये मोठी रक्कम दान केली होती. आता मेगास्टार चिरंजीवी, महेश बाबू, नंदामुरी बालकृष्ण आणि आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री साउथ स्टार पवन कल्याण यांनी मुख्यमंत्री मदत निधीसाठी देणगी दिली आहे.
In light of the floods impacting both the Telugu states, I am pledging a donation of 50 lakhs each to the CM Relief Fund for both AP and Telangana. Let’s collectively support the measures being undertaken by the respective governments to provide immediate aid and facilitate the…
— Mahesh Babu (@urstrulyMahesh) September 3, 2024
चिरंजीवीनं एक कोटी रुपयांची दिली देणगी : आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये मुसळधार पाऊस झाल्यामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे, याबद्दल चिरंजीवी यांनी दुःख व्यक्त केलं आहे. त्यांनी एक्स अकाउंटवर लिहिलं आहे की, "तेलुगू राज्यांतील पुराच्या प्रभावामुळे लोकांना होणारा त्रास मला अस्वस्थ करत आहे. निष्पाप जीव गमावणे हे अतिशय दुःखद आहे. तेलगू राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार दोन्ही सरकारे शक्य तितकी परिस्थिती सुधारण्याचे काम करत आहेत. आपण सर्वांनी कोणत्या ना कोणत्या प्रकारे मदत कार्यात सहभागी होण्याची गरज आहे. या प्रक्रियेचा एक भाग म्हणून, मी दोन राज्यातील लोकांच्या मदतीसाठी एक कोटी रुपये (आंध्र प्रदेश आणि तेलंगणा सीएम रिलीफ फंडाला प्रत्येकी 50 लाख) देणगी देण्याची घोषणा करत आहे. मी देवाला प्रार्थना करतो की ही भीषण परिस्थिती लवकरच संपेल. सर्व लोक सुरक्षित राहतील."
महेश बाबूनं एक कोटी रुपयांची दिली देणगी : साऊथ अभिनेता महेश बाबूनं देखील लोकांच्या मदतीसाठी हात पुढे केला आहे. त्यानं त्याच्या एक्स पोस्टवर मदतीची रक्कम जाहीर करताना लिहिलं की, "दोन्ही तेलुगू राज्यांमध्ये अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या वाईट परिस्थितीमुळे, लोकांच्या मदतीसाठी मी दोन्ही राज्यांच्या सरकारला 50-50 लाख रुपये दान करतो. चला आपण सर्वांनी मिळून सरकारला साथ देऊया. बाधित लोकांच्या जीवनाला नवी संधी देऊ या." तसेच साऊथ सुपरस्टार ज्युनियर एनटीआरनं देखील मुख्यमंत्री मदत निधीमध्ये प्रत्येकी 1 कोटी रुपयांची देणगी दिली आहे.
हेही वाचा :
- कृष्ण जन्माष्टमीनिमित्त महेश बाबूच्या आवाजासह 'मुफासा: द लायन किंग'चा तेलुगु ट्रेलर प्रदर्शित - Mufasa The Lion King
- महेश बाबू तेलुगू व्हर्जनमध्ये 'मुफासा द लायन किंग'साठी व्हॉईस ओव्हर करणार, 'या' दिवशी होईल ट्रेलर रिलीज - MAHESH BABU
- मेगास्टार चिरंजीवी आणि ज्येष्ठ अभिनेत्री वैजयंतीमाला यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या हस्ते पद्मविभूषण प्रदान - Padma Vibhushan Chiranjeevi