मुंबई - तापसी पन्नू आणि मॅथियास बोई यांच्या लग्नाच्या बातम्या झळकल्या असताना या जोडप्यानं या बातमीला अधिकृत दुजोरा अद्याप दिलेला नाही. त्यामुळे त्यांचे चाहते त्यांच्या सोशल मीडिया अपडेटकडे डोळे लावून बसले आहेत. तापसी आणि मॅथियासच्या लग्नाच्या बातम्यांनी वेबलॉइड्स भरले असताना, त्यांच्या इंस्टाग्राम स्टोरीजवर एक संदेश शेअर केला आणि सर्वांना 'होळीच्या शुभेच्छा' दिल्या आहेत.
मॅथियासने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये तापसीच्या घरातील स्वतःचा एक फोटो शेअर केला आहे. यामुळे ऑनलाइन खळबळ उडाली. त्याने पोस्ट केलेल्या फोटोमध्ये, मॅथियास ग्रे रंगाचा टी-शर्ट घातलेला दिसत आहे आणि त्याचा चेहरा लाल रंगाने रंगला आहे.
मॅथियासने उदयपूरमध्ये तापसीशी गुपचूप लग्न केल्याची बातमी पसरली आहे. काहींचे म्हणणे आहे त्यांनी शनिवारीच आपले लग्न उरकलं होतं. बुधवारी लग्नाच्या विधींना सुरू झाली होती आणि त्यांच्या लग्नाला केवळ जवळचे मित्र आणि नातेवाईक हजर होते. परंतु या बातम्यांना दोघांनीही अजिबात दुजोरा न देता दुर्लक्ष केल्याचं दिसतंय. त्यामुळे चाहत्यांमध्ये अद्यापही संभ्रमाचं वातावरण आहे.
त्यांच्या कथित लग्नात पाहुणे म्हणून यापूर्वी तापसी बरोबर काम केलेला पावेल गुलाटी आणि तापसीचा चांगला मित्र चित्रपट निर्माता अनुराग कश्यप, पटकथालेखन करणारी कनिका ढिल्लन आणि हिमांशू शर्मा ही जोडी यांची उपस्थिती होती. हा लग्नसोहळा स्टार स्टडेड होता असा दावाही काही न्यूज पोर्टल्सनी केला आहे.
तापसी लग्न करणार असल्याच्या बातम्या काही काळापासून सुरू होत्या. गेल्या महिन्यात अशी एक बातमी आली होती की सेलेब्रिटींच्या अनुस्थितीत ती अतिशय खासगी पद्धतीनं लग्न करणार आहे. आपल्या पार्टनस बरोबर ती आनंदात असून कोणताही थाटमाट न करता दोघांनीही लग्न करायचंय.
तिच्या डेटिंग लाइफबद्दल बोलताना, तापसी म्हणाली होती की हे केवळ आकर्षण नव्हते तर योग्य व्यक्तीचा शोध घेताना तिला अनेक संबंधातून जावे लागलंय. मॅथियास हा एक सजग आणि परिपक्व व्यक्ती आहे, त्यामुळे त्यांच्यातील नातेसंबंध मजबूत आहेत.
हेही वाचा -
- अमिताभ बच्चन ते अल्लू अर्जुनपर्यंत सेलिब्रिटींनी चाहत्यांना दिल्या होळीच्या शुभेच्छा, पाहा पोस्ट - Holi 2024
- होळी पार्टीचा आनंद लुटण्यासाठी ही टॉप 5 गाणी प्ले तुमच्या लिस्टमध्ये नक्की सामील करा - Top 5 Holi Song
- बच्चन कुटुंबानं पारंपरिक पद्धतीनं साजरा केला 'होलिका दहन' उत्सव - Bachchan family Holika Dahan