ETV Bharat / entertainment

आदिनाथ कोठारे दिग्दर्शित 'पाणी' चित्रपट होणार 'या' दिवशी प्रदर्शित - Adinath Kothare

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 20, 2024, 12:29 PM IST

Updated : Aug 20, 2024, 4:02 PM IST

Paani Movie : आदिनाथ कोठारे दिग्दर्शित 'पाणी' चित्रपट हा सध्या चर्चेत आहे. राजश्री एंटरटेनमेंट, जागतिक आइकॉन प्रियांका चोप्रा जोनसचं प्रॉडक्शन हाऊस 'पर्पल पेबल पिक्चर्स' आणि महाराष्ट्रातील प्रतिष्ठित प्रॉडक्शन हाऊस, 'कोठारे व्हिजन' हे एकत्र येऊन चाहत्यांना सुंदर भेट देणार आहे.

Paani Movie
पाणी चित्रपट (instagram)

मुंबई - Paani Movie : राजश्री एंटरटेन्मेंट आणि पर्पल पेबल पिक्चर्स, कोठारे व्हिजन प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने 'पाणी' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनेता आदिनाथ कोठारे याचं दिग्दर्शकीय पदार्पण असलेल्या या चित्रपटाला पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. आता हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाला असून येत्या 18 ऑक्टोबरला चित्रपटगृहात रिलीज होणार आहे.

'पाणी' चित्रपट लवकरच होणार प्रदर्शित : राजश्री एंटरटेन्मेंटसारखा मोठा बॅनर, इंटरनॅशनल आयकॉन अशी ख्याती असणारी प्रियांका चोप्रा आणि महाराष्ट्राची शान असलेलं कोठारे व्हिजन प्रा. लि.असे तिन्ही मोठे निर्माते 'पाणी'च्या निमित्ताने एकत्र आले आहेत. शिवाय राष्ट्रीय पुरस्काराचं शिक्कामोर्तब झाल्यामुळे या चित्रपटाकडून चित्रपटरसिकांना खूप अपेक्षा आहेत. 'पाणी' मध्ये आदिनाथ कोठारे, रुचा वैद्य, सुबोध भावे, रजित कपूर, किशोर कदम, नितीन दीक्षित, सचिन गोस्वामी, मोहनाबाई, श्रीपाद जोशी, विकास पांडुरंग पाटील या कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाची कहाणी नितीन दीक्षित आणि आदिनाथ कोठारे यांनी लिहिली आहे. तर चित्रपटाचे निर्माते नेहा बडजात्या, दिवंगत रजत बडजात्या, प्रियांका चोप्रा जोनस, डॉ मधू चोप्रा हे आहेत. याशिवाय महेश कोठारे, सिद्धार्थ चोप्रा या चित्रपटाचे सहयोगी निर्माते आहेत. या चित्रपटाबद्दल पर्पल पेबल पिक्चर्सची संस्थापक आणि प्रवर्तक प्रियांका चोप्रा जोनसनं प्रतिक्रिया देत म्हटलं, "पाणी' हा चित्रपट जगभरातील प्रेक्षकांसाठी घेऊन येताना खूप आनंद होतोय. एक असा उत्कट प्रकल्प जो अतिशय महत्वाचा मुद्दा हाताळणार आहे. हा चित्रपट खूप खास आहे. निर्मितीसाठी आव्हानात्मक असला तरी आपण ज्या काळात राहात आहोत, त्या काळासाठी तो खूप प्रासंगिक आहे. हा एका अशा माणसाचा प्रवास आहे, ज्यानं आपल्या आजूबाजूच्या सर्वांच्याच जीवनात आमूलाग्र बदल घडवला. हा प्रवास सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे."

पाणीटंचाईच्या समस्येवर आधारित चित्रपट : यानंतर तिनं पुढं म्हटलं, "पर्पल पेबल पिक्चर्स नेहमीच अनोख्या, अविश्वसनीय आणि भारतातील प्रत्येक प्रदेशातील स्थानिक पार्श्वभूमीवरच्या कथानकांना प्रोत्साहन देतो. 'पाणी' हा चित्रपट प्रेरणादायी ज्वलंत उदाहरण आहे. आदिनाथचं दिग्दर्शन विशेष उल्लेखनीय आहे. या संपूर्ण टीमचे, त्यांच्या मेहनतीचे मनापासून आभार. माझा चौथा मराठी चित्रपट मी राजश्री एंटरटेनमेंट आणि कोठारे व्हिजन प्रायव्हेट लिमिटेड यांच्यासारख्या दोन मोठ्या संस्थांबरोबर घेऊन येत आहे. याचा मला आनंद आहे." तसेच राजश्री एंटरटेन्मेंटच्या नेहा बडजात्या यांनी म्हटलं, ''राजश्री एंटरटेन्मेटचा हा पहिला मराठी चित्रपट आहे आणि 'पाणी' सारखा चित्रपट घेऊन, तगड्या टीमसह आम्ही प्रेक्षकांच्या भेटीला येतोय, याचा आनंद खूप जास्त आहे. हा चित्रपट पाणीटंचाईच्या समस्येवर आधारित आहे. 'पाणी' या सामाजिक प्रश्नाबद्दल जागरूकता निर्माण करण्यात हा चित्रपट महत्त्वपूर्ण योगदान देईल, असा आम्हाला विश्वास आहे.''

आदिनाथ कोठारेनं केल्या भावना व्यक्त : या चित्रपटाबाबत आदिनाथ कोठारेनं म्हटलं, "प्रियांका चोप्रा जोनस, राजश्री एंटरटेन्मेंट यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव म्हणजे माझ्यासाठी एक मोठी संधी आहे. माझ्या दिग्दर्शन पदार्पणाच्या चित्रपटाला अशी टीम लाभणे, हे मी माझे भाग्य समजतो. 'पाणी' लवकरच तुमच्या जवळच्या सिनेमागृहात प्रदर्शित होईल आणि संपूर्ण टीमला विश्वास आहे की हा एक अनुभव असेल जो दीर्घकाळ प्रेक्षकांबरोबर राहील." आता या चित्रपटाच्या रिलीजची वाट चाहते करत आहेत.

Last Updated : Aug 20, 2024, 4:02 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.