मुंबई - Bagh ka Kareja : बॉलिवूड ज्येष्ठ अभिनेता मनोज बाजपेयीनं त्यांच्या वाढदिवसानिमित्त आगामी चित्रपट 'भैय्या जी'च्या ''बाघ का करेजा' या गाण्याचा टीझर रिलीज केला होता. आता हे गाणे आज रिलीज करण्यात आलं आहे. ज्यामध्ये मनोज बाजपेयी फुल ॲक्शन मोडमध्ये दिसत आहे. या गाण्यात त्याची देसी झलक पाहायला मिळत आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन अपूर्व सिंग कार्की यांनी केलंय. ज्यानं यापूर्वी बाजपेयींचा कोर्टरूम ड्रामा 'एक बंदा काफी है' दिग्दर्शित केला होता. मनोज बाजपेयी स्टारर 'भैय्या जी' हा 24 मे 2024 रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.सध्या या चित्रपटाबद्दल सोशल मीडियावर खूप चर्चा होत आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
'बाघ का करेजा' झालं रिलीज : 'भैय्या जी' चित्रपटामधील 'बाघ का करेजा' हे गाणं प्रसिद्ध गायक मनोज तिवारी यांनी त्यांच्या सुरेल आवाजात गायलं आहे. या गाण्याचे बोल डॉ सागर यांनी लिहिले आहेत. या गाण्याला संगीत हे आदित्य देव यांनी दिलंय. आता सोशल मीडियावर हे गाणं खूप पसंत केलं जात आहे. हे गाणं पाहून अनेकांना गैंग्स ऑफ वासेपुर'ची आठवण झाली आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी आता अनेकजण आतुर आहेत. विनोद भानुशाली, कमलेश भानुशाली, शैल ओसवाल, शबाना रझा बाजपेयी , समिक्षा ओसवालआणि विक्रम खाखर यांनी निर्मित केलेला हा चित्रपट भानुशाली स्टुडिओ लिमिटेड, एसएसओ प्रॉडक्शन्स आणि औरेगा स्टुडिओज यांच्यातील सहयोगाद्वारे बनवला गेला आहे.
'भैय्या जी'चा टीझर थरारक : या चित्रपटाच्या टीझरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. मनोजनं त्याच्या सोशल मीडिया हँडलवर चित्रपटाचा टीझर रिलीज करत कॅप्शनमध्ये लिहिलं होतं, "आता निवेदन नाही, नरसंहार होईल, भैय्या जी'ची पहिली झलक आली आहे. 24 मे पासून चित्रपटगृहांमध्ये पाहा." या टीझरमध्ये मनोज हा गुंडाच्या भूमिकेत दिसला होता. दरम्यान मनोज बाजपेयीनं आपल्या 30 वर्षांच्या कारकिर्दीत हिंदी चित्रपटसृष्टीला अनेक चित्रपट दिले आहेत. 'भैय्या जी' हा त्यांच्या करिअरमधील 100वा चित्रपट आहे.
हेही वाचा :