ETV Bharat / entertainment

Bhaiyya Ji Poster: 'भैय्या जी' चित्रपटामधील मनोज बाजपेयीचे फर्स्ट लूक पोस्टर रिलीज - Bhaiyya Ji Poster

Bhaiyya Ji Poster: 'भैय्या जी' चित्रपटामधील मनोज बाजपेयीचे फर्स्ट लूक पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. हा चित्रपट 24 मे रोजी प्रदर्शित होणार आहे.

Bhaiyya Ji Poster
भैय्या जी पोस्टर
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 14, 2024, 5:36 PM IST

मुंबई - Bhaiyya Ji Poster: अभिनेता मनोज बाजपेयी अशाच स्टार्सपैकी एक आहे, ज्यानं आपल्या प्रतिभेनं प्रेक्षकांच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केली आहे. लवकरच तो 'भैय्या जी' चित्रपटात दिसणार आहे. मनोज बाजपेयीनं आता 14 मार्च रोजी सोशल मीडियावर एक पोस्टर शेअर केलं आहे. या पोस्टरमध्ये तो त्याच्या स्फोटक स्टाईलमध्ये दिसत आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'भैय्या जी'च्या पोस्टरवरील मनोज बाजपेयीच्या व्यक्तिरेखा देशी अंदाजामधील आहे. धोती आणि कुर्ताबरोबर त्यानं एक गमचा परिधान केला आहे. त्याचा हा हटके लूक अनेकांना आवडत आहेत. या चित्रपटाचं लेखन दीपक किंगराणी यांनी केलंय.

'भैय्या जी' चित्रपटामधील मनोज बाजपेयीचं फर्स्ट लूक रिलीज : 'भैय्या जी'चे निर्माते विनोद भानुशाली आहेत. यापूर्वी मनोज त्याच्या कोर्टरूम ड्रामा चित्रपट 'सिर्फ एक बंदा काफी है'मध्ये दिसला होता. 'भैय्या जी' हा चित्रपट 24 मे रोजी प्रदर्शित होणार आहे. 'भैय्या जी' या चित्रपटाची कहाणी सूड आणि कौटुंबिक बाँडिंगवर आधारित आहे. या चित्रपटात दोन कुटुंबांमधील संघर्ष आणि हाणामारी पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट पाहिल्यानंतर तुम्हाला मनोज बाजपेयीचा गँग्स 'ऑफ वासेपूर' आठवेल अशी शक्यता आहे. मनोजचा हा अंदाज नक्की चाहत्यांना आवडेल असं सध्या दिसत आहेत, कारण मनोजनं शेअर केलेल्या पोस्टवर अनेकजण आता प्रतिक्रिया देत आहेत.

'भैय्या जी' चित्रपटाचा टीझर कधी होणार रिलीज : 'भैय्या जी'चा टीझरबाबात एक अपडेट समोर आली आहे. या चित्रपटाचा टीझर 20 मार्च रोजी 2.42 वाजता प्रदर्शित होणार आहे. आता हा चित्रपट पाहण्यासाठी अनेकजण उत्सुक असल्याचं दिसत आहेत. कारण त्याचे चाहते त्यानं शेअर केलेल्या पोस्टवर त्याला या चित्रपटासाठी शुभेच्छा देताना दिसत आहेत. दरम्यान मनोज बाजपेयीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तो शेवटी 'किलर सूप'मध्ये कोंकणा सेन शर्माबरोबर दिसला होता. त्याचा हा चित्रपट प्रचंड गाजला होता. याशिवाय पुढं तो 'राख' या चित्रपटामध्ये जॉन अब्राहमबरोबर दिसणार आहे.

हेही वाचा :

  1. Madhusudan Kalelkar : मधुसूदन कालेलकर जन्मशताब्दी महोत्सव, रंगकर्मी आणि रसिकांसाठी पर्वणी
  2. दिलजीत दोसांझ आणि परिणीतीचे 'अमर सिंग चमकिला'मधील ताल धरायला लावणारे 'नरम कालजा' गाणे रिलीज
  3. Sidharth Malhotra Economy Class : सिद्धार्थ मल्होत्राचा फ्लाईटमधील व्हिडिओ व्हायरल

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.