मुंबई : तेलुगू सुपरस्टार महेश बाबू आणि दिग्गज दिग्दर्शक एसएस राजामौली एका बहुप्रतीक्षित प्रोजेक्टसाठी एकत्र येत आहेत. या प्रोजेक्टला 'एसएसएमबी29' असं तात्पुरते नाव देण्यात आलं आहे. राजामौली यांच्या प्रोजेक्टचा श्री गणेश आजपासून केला गेला आहे. आज, 2 जानेवारी, 2025 रोजी 'एसएसएमबी29'च्या पूजन समारंभाचे आयोजन अल्युमिनियम फॅक्टरी, हैदराबाद येथे करण्यात आले आहे. आता या पूजा समारंभातील काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. महेश बाबू कधीही त्यांच्या चित्रपटांच्या पूजा समारंभाना उपस्थित राहत नाहीत, मात्र त्यानं यावेळी या कार्यक्रमामध्ये हजेरी लावली आहे.
महेश बाबू आणि राजमौली एकत्र करणार काम : दरम्यान ऑक्टोबर 2024मध्ये, राजामौली यांनी आफ्रिकेतील लोकेशन स्काउटिंगसह चित्रपटाच्या प्री-प्रॉडक्शन प्रवासाची झलक शेअर केली होती. 'एसएसएमबी29' चित्रपट खजिन्याच्या शोधावर आधारित आहे, जो जबरदस्त दृश्यांसह प्रेक्षकांना पाहायला मिळेल. आफ्रिकेशिवाय एसएस राजामौली यांनी या चित्रपटासाठी आंध्रप्रदेशमधील बोर्रा गुफासह काही परदेशातील विविध ठिकाणांनाही भेट दिली आहे. तसेच त्यांनी हैदराबादमधील निर्मितीसाठी एक खास सेटही निवडला आहे.
आता चित्रपटाच्या लोकेशनव
महेश बाबूबरोबर दिसणार प्रियांका चोप्रा : आता चित्रपटाच्या लोकेशनवरून असं समजून येत आहे की, हा चित्रपट जोरदार असेल. विजयेंद्र प्रसाद लिखित हा चित्रपट भारतीय चित्रपटसृष्टीत यापूर्वी कधीही न पाहिलेले दृष्य सादर करण्याच्या तयारीत आहे. महेश बाबू चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटामध्ये प्रियांका चोप्रा आणि पृथ्वीराज सुकुमारन यांच्या देखील महत्वाच्या भूमिकेत असणार आहेत. याशिवाय या चित्रपटामध्ये काही परदेशी कलाकार देखील झळकणार आहेत. 'एसएसएमबी29' चित्रपटाची निर्मिती के.एल. नारायणद्वारा दुर्गा आर्ट्स करत आहे. या चित्रपटाचे शूटिंग 2025 मध्ये सुरू होईल. हा चित्रपट 2028मध्ये बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित होणार आहे. जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात चित्रपटाची शूटिंग सुरू होऊ शकते. महेश बाबू या चित्रपटासाठी सध्या खूप तयारी करत आहे. सध्या महेश बाबूला एका हिट चित्रपटाची गरज आहे.
हेही वाचा :
- बिपाशा बसू ते महेश बाबूपर्यंत 'या' सेलिब्रिटींनी त्यांच्या मुलांबरोबर साजरा केला ख्रिसमस
- दाक्षिणात्य अभिनेत्यांचा दानशुरपणा! चिरंजीवीसह महेश बाबूकडून पूरग्रस्तांसाठी 1 कोटी रुपयांची देणगी - flood relief in telangana and ap
- कृष्ण जन्माष्टमीनिमित्त महेश बाबूच्या आवाजासह 'मुफासा: द लायन किंग'चा तेलुगु ट्रेलर प्रदर्शित - Mufasa The Lion King