मुंबई - जुनैद खानच्या 'महाराज' या पहिला चित्रपटाला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित करण्यासाठी अखेर गुजरात उच्च न्यायालयाने हिरवा कंदील दाखवला आहे. 1862 च्या 'महाराज' बदनामीच्या प्रकरणाभोवती केंद्रीत असलेल्या या चित्रपटाला न्यायालयाची मान्यता मिळाली. चित्रपट पाहिल्यानंतर प्रेक्षकांनी एक्स या सोशल मीडियावर उत्स्फुर्त प्रतिक्रिया दिल्या आहेत.
जुनैद खानने त्याच्या पदार्पणात पत्रकार आणि समाजसुधारकाची भूमिका साकारली आहे. त्याच्या अभिनयाचं वर्णन ''अम्युचुअर परंतु उत्तम'' असं एका प्रेक्षकानं केलंय. दुसऱ्यानं जुनैदच्या अभिनयाचे "विलक्षण" म्हणून कौतुक केलंय. त्याचा अभिनय तुमच्या स्मरणात राहिल असंही त्यानं पुढं म्हटलंय.
सत्य घटनांवर आधारित 'महाराज' हा चित्रपट नेटिझन्सशी एकरूप झाल्याचं दिसत आहे. अशा आणखी काही चित्रपटाची निर्मिती व्हायला हवी असंही एकानं म्हटलंय. "बनावट मौलवी, पुजारी यांच्यावर अधिक चित्रपट व्हायला पाहिजेत, कारण असे छेडछाड करणारे प्रत्येक धर्मात असतात," असे एका युजरनं मत व्यक्त केलं. चित्रपटाच्या संदेशावर मत व्यक्त करताना एका युजरनं लिहिलं, "जे नैतिकदृष्ट्या चुकीचं आहे ते धर्मशास्त्रीयदृष्ट्या योग्य असू शकत नाही, महाराज चित्रटामधील मुंबई सर्वोच्च न्यायालयाचे अन्वेषण!"
कथा आणि पटकथेसह दिग्दर्शक सिद्धार्थ पी. मल्होत्रा यांनाही प्रेक्षकांकडून दाद मिळत आहे. ट्विटरवर विचार शेअर करताना, एका युजरनं कमेंट केली, "नेटफ्लिक्सवर महाराज चित्रपट पाहिला, हा चित्रपट सत्य घटनांवर आधारित आहे. या वरच्या थरातील सॅडिस्ट बदमाशांनी चरणस्पर्शच्या नावाखाली खालच्या पदावरील लोकांचं कसं शोषण केलं हे पाहून खूप निराशा झाली. धार्मिक प्रथांच्या सन्मानाच्या नावाखाली भोळ्या लोकांनी स्वतःची विक्री केली."
रिलीजपूर्व वादावर मत देताना एका युजरनं म्हटले, "महाराज पाहत आहे. हा चित्रपट पाहून केवळ समाजातील काही लोक नाराज होतील. हा भारतीय समाजासाठी अत्यंत महत्त्वाचा चित्रपट आहे. प्रत्येकाने पाहावा."
दुसऱ्या समीक्षकेमध्ये एकानं टीका केली, " फसवणूक अंधश्रद्धा आणि धर्मगुरुंना विरोध या गोष्टीसाठी चित्रपटाशी सहमत आहे. परंतु हे केवळ तितकच आहे. हा चित्रपट अंदाज लावता येण्याजोगा आणि पास करण्यायोग्य वाटला. जुनैद खान ठीक आहे. शालिनी पांडेचे संवाद थोडेसे आलिया भट्टसारखेच होते. जयदीप अहलावत, ठीक आहे. ."
एका प्रेक्षकानं शेअर केलं की, "चित्रपटात अपेक्षेपेक्षा जास्त चांगलं कथानक आहे, संगीत उत्तम आहे. महाराज हा चित्रपट निव्वळ मनोरंजनापेक्षा अधिक आहे; ही गोष्ट विचार करायला लावणारी आहे." धार्मिक भावना दुखावल्याचा दावा करून या चित्रपटाच्या प्रदर्शनाला विरोध करण्यात आला होता. न्यायालयाच्या निर्णयानंतर चित्रपटाच्या निर्मात्यांनी इन्स्टाग्रामवर आभार व्यक्त केले. “महाराज चित्रपटाच्या रिलीजला परवानगी दिल्याबद्दल आम्ही न्यायव्यवस्थेचे आभारी आहोत,” असे पोस्टमध्ये म्हटले आहे.
त्यांच्या 50 वर्षांच्या प्रदीर्घ वारशावर प्रकाश टाकताना, यशराज फिल्म्सने सांगितले की, "आम्ही कधीही आपल्या देशाची किंवा देशवासियांची प्रतिष्ठा कलंकित करणारा चित्रपट तयार केलेला नाही."
हेही वाचा -
- अभिनेता अनुपम खेर यांच्या कार्यालयात चोरी करणाऱ्या दोघांना मुद्देमालासह जोगेश्वरीतून अटक - Theft at Anupam Kher office
- सोनाक्षी सिन्हा-झहीर इक्बालच्या मेहंदी सोहळ्याचे सुंदर फोटो आले समोर - Sonakshi Sinha Wedding
- थलपथी विजयच्या वाढदिवसानिमित्त G.O.A.T चा थरारक अॅक्शन टीझर लॉन्च - Thalapathy Vijay birthday