जमशेदपूर - Madhuri Dixit birthday : धक-धक गर्ल माधुरी दीक्षितचा आज 57 वा वाढदिवस आहे. मंगळवारी तिचा चाहता पप्पू सरदारने साकची हंडी लाईनवर असलेल्या मनोहर चाट शॉपमध्ये मतदार जनजागृती संदेश देऊन तिचा वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा केला. मतदान जनजागृतीचे विविध संदेश देणारे बॅनर आणि पोस्टर्स तसंच मातीपासून बनवलेल्या अनेक आकर्षक शिल्पांनी दुकान सजवण्यात आलं होतं.
सर्वात पहिल्यांदा सायंकाळी पंडित संतोषकुमार त्रिपाठी यांच्या हस्ते माधुरी दीक्षितच्या दीर्घायुष्यासाठी दुकानात गणेशाची पूजा करण्यात आली. गणेशमूर्तीच्या माध्यमातून मतदारांचीही जागृती करण्यात आली. रात्री नऊ वाजता आदिवासी समाजातील महिलांनी मतदार जागृतीचा संदेश देणारं पोस्टर लावून सरहूल नृत्य केलं.
रात्री 10.30 वाजता केक कापण्याचा कार्यक्रम झाला. दिवसभर, विशेषत: महिला आणि मुलींमध्ये मतदान जनजागृतीचे संदेश देणारे पोस्टर्ससह सेल्फी काढण्याची स्पर्धा होती. जमशेदपूरमध्ये शनिवारी 25 मे रोजी लोकसभेची निवडणूक होणार आहे, तोपर्यंत दुकानातून मतदार जागृतीचे संदेश दिले जातील.
बुधवारी सकाळी 10 वाजता माधुरी दीक्षितच्या वाढदिवसाचा आनंद चेशायर होम, करंदीह येथे राहणाऱ्या दिव्यांग (विशेष व्यक्ती) यांच्याबरोबर शेअर केला जाणार आहे. यावेळी त्यांना भोजन व भेटवस्तू देण्यात येणार आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी बुधवारी १५ मे रोजी संध्याकाळी माधुरी दीक्षितच्या वाढदिवसानिमित्त मोफत चाट वाटप करण्यात येणार आहे.
गेल्या २८ वर्षांपासून अभिनेत्री माधुरी दीक्षितचा वाढदिवस दरवर्षी साजरा करणाऱ्या शहरातील पप्पू सरदार यांनी माधुरीचा भक्त म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवली आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी त्याच्या अनेक हितचिंतकांनी त्याला या कामात यश मिळवून देण्यासाठी सहकार्य केलं आहे.
हेही वाचा -