ETV Bharat / entertainment

प्रतीक गांधी दिव्येंदू अविनाश तिवारी स्टारर 'मडगाव एक्सप्रेस' ट्रेलर प्रदर्शित - मडगाव एक्सप्रेस ट्रेलर रिलीज

Madgaon Express Trailer OUT : 'मडगाव एक्सप्रेस' या चित्रपटाचा ट्रेलर आज 5 मार्च रोजी प्रदर्शित झाला आहे. दिव्येंदू, प्रतीक गांधी, अविनाश तिवारी, नोरा फतेही, उपेंद्र लिमये आणि छाया हे या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.

Madgaon Express Trailer OUT
मडगाव एक्सप्रेस ट्रेलर रिलीज
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 5, 2024, 5:37 PM IST

मुंबई - Madgaon Express Trailer OUT : अभिनेता दिव्येंदू, प्रतीक गांधी, अविनाश तिवारी, नोरा फतेही, उपेंद्र लिमये आणि छाया स्टारर 'मडगाव एक्सप्रेस' या चित्रपटाचा मजेशीर ट्रेलर आज 5 मार्च रोजी रिलीज झाला आहे. याआधी काल, करिश्माई महिला डॉन कांचन कोंबडीचा फर्स्ट लूक समोर आला होता. रितेश सिधवानी आणि फरहान अख्तर यांची एक्सेल एंटरटेनमेंट नेहमीच अनोखी आणि मनोरंजक सामग्री तयार करण्यात माहिर आहे. यावेळीही त्याने आपल्या नवीन चित्रपटाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर प्रेक्षक या चित्रपटाची वाट पाहत आहेत.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

'मडगाव एक्स्प्रेस'चा ट्रेलर रिलीज : 'मडगाव एक्स्प्रेस'मधील कांचन कोंबडीचा फर्स्ट लूक खूप चर्चेत आला आहे. कांचन कोंबडीचा स्वॅग आणि आकर्षक सनग्लासेस पाहिल्यानंतर अनेकजणांना या चित्रपटाबद्दल कुतूहल वाटत आहे. कुणाल खेमू लिखित आणि दिग्दर्शित हा चित्रपट 22 मार्च 2024 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. 'मडगाव एक्सप्रेस' रितेश सिधवानी आणि फरहान अख्तरच्या एक्सेल एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली बनवण्यात आला आहे. निर्मात्यांनी अतिशय कुशलतेने लेडी डॉनला अप्रतिम फॅशन स्टेटमेंट्स जबरदस्त बनवलं आहे. 'मडगाव एक्स्प्रेस'ची कहाणी तीन मित्रांवर आधारित आहे, ज्यांना गोव्याला जायचं आहे.

'मडगाव एक्स्प्रेस'चा ट्रेलर : 'मडगाव एक्स्प्रेस' या चित्रपटामध्ये नोरा फतेही एक कॅनेडियन नृत्यांगना आहे. हा चित्रपट खूप कॉमेडी असणार आहे. या चित्रपटामध्ये हे तिन्ही मित्र गोव्याला जाताना कसा संघर्ष करतात, हे मजेशीर मांडण्यात आला आहे. खुणाल खेमूचं दिग्दर्शन कमालीचं वेगळेपण दर्शवणारं आहे. फुक्रेच्या निर्मात्यांनी बनवलेला मडगाव एक्सप्रेस हा चित्रपट एका रोमँटिक, कॉमेडी ड्रामा अनेक टर्न आणि ट्विस्ट आणि रोमहर्षक प्रसंगांनी खचाखच भरलेला आहे. यामध्ये उपेंद्र लिमये पुन्हा एकदा भाव खाऊन जाताना दिसतो. यात त्याने साकारलेला डॉन अ‍ॅनिमल चित्रपटातील त्याच्या प्रभावी भूमिकेची आठवण करुन देणारी आहे. यामध्ये सैराट फेम छाया कदम यांनी साकारलेली खलनायिका कमालीचे लक्ष वेधून घेणारी आहे. दिव्येंदू, प्रतीक गांधी यांच्या चाहत्यांसाठी हा चित्रपट एक नवी पर्वणी ठरेल याची खात्री ट्रेलरने दिली आहे.

हेही वाचा :

  1. अनंत अंबानींच्या प्री-वेडिंगमध्ये थिरकलेल्या सेलेब्रिटींवर कंगना रणौतचा हल्ला बोल
  2. कियारा अडवाणीनं फरहान अख्तरच्या 'डॉन 3'साठी घेतली तब्बल 'इतकी' फी
  3. होमी अदजानियाचा गूढ, कॉमेडी, रोमान्स थ्रिलर 'मर्डर मुबारक'चा ट्रेलर लॉन्च

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.