मुंबई - Ranbir Kapoor starrer Ramayan : बॉलिवूड स्टार रणबीर कपूर आणि साऊथ अभिनेत्री साई पल्लवी यांची प्रमुख भूमिका असलेल्या 'रामायण' या बहुप्रतीक्षित चित्रपटाची सर्वांनाच प्रतीक्षा आहे. रामायणावर अतिभव्य आणि प्रचंड बजेट असलेला चित्रपट बनवण्याची ही पहिलीच वेळ आहे. रामायण हा बॉलिवूडचे ख्यातनाम दिग्दर्शक नितेश तिवारी यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. 'रामायण भाग 1' साठी प्रेक्षकांना बरीच दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागू शकते, कारण त्याची कथित रिलीज डेट समोर आली आहे.
रामायण कधी रिलीज होणार?
कालच बातमी आली होती की 'रामायण' चित्रपटाचे बजेट 800 कोटींहून अधिकचे आहे. या चित्रपटाच्या पोस्ट प्रॉडक्शनचे काम 600 दिवस म्हणजे अंदाजे 2 ते 2 वर्षे सुरू राहणार आहे. असं जर घडलं तर 'रामायण' चित्रपटाची प्रतीक्षा ही प्रेक्षकांसाठी वनवासासारखी दीर्घ काळाची असेल. कारण हा चित्रपट ऑक्टोबर 2027 मध्ये प्रदर्शित होणार आहे. म्हणजे 'रामायण पार्ट 1' हा चित्रपट बनायला तीन वर्षांचा कालावधी लागणार आहे.
रणबीर कपूरचा वर्क फ्रंट
या तीन वर्षांत रणबीर कपूर संदीप रेड्डी वंगा यांचा 'अॅनिमल पार्क', अयान मुखर्जीचा 'ब्रह्मास्त्र भाग २' आणि संजय लीला भन्साळीचा चित्रपट 'लव्ह अँड वॉर'मध्ये झळकलेला असेल. हे तीन चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर रणबीर कपूर त्याच्या चाहत्यांना भगवान रामाच्या भूमिकेत दिसणार आहे. रामायणात रणबीर कपूर प्रभू रामाची भूमिका साकारणार असून दक्षिणेतील सौंदर्यवती अभिनेत्री साई पल्लवी रामायणात सीतेची भूमिका साकारणार आहे. दूरदर्शनवरील 'रामायण' मालिका फेम 'राम' अरुण गोविल रामाच्या वडिलांच्या भूमिकेत तर लारा दत्ता कैकयीच्या भूमिकेत दिसणार आहे.
हेही वाचा -