ETV Bharat / entertainment

लोकसभा निवडणुकीच्या निकालापूर्वी कंगना राणौतनं घेतला देवी अंबिका आणि तिच्या आईचा आशीर्वाद - loksabha election result 2024

kangana ranaut : कंगना राणौतनं निवडणूक निकालापूर्वी देवी अंबिका आणि तिच्या आईचा आशीर्वाद घेतला आहे. आता तिनं याची झलक इन्स्टाग्रामवर दाखवली आहे.

kangana ranaut
कंगना राणौत (kangana ranaut -instagram)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 4, 2024, 3:28 PM IST

मुंबई - kangana Ranaut : सध्या लोकसभेच्या 542 जागांसाठी मतमोजणी सुरू आहे. त्यामुळे आता देशभरात निकालाची उत्सुकता लागली आहे. यावेळी हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री कंगना राणौतही निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे. तिनं हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आहे. कंगना निवडणूक जिंकण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. मतमोजणीदरम्यान कंगना पूजा करत आहे. आपल्या विजयाच्या आशेनं कंगनानं अंबिका मातेचं दर्शन घेतलं. यावेळी तिच्या आईनं तिला दही आणि साखर खाऊ घालून आशीर्वाद दिला आहे. त्याची झलक कंगनानं सोशल मीडियावरही शेअर केली आहे.

कंगना राणौतची पोस्ट : चित्रपटांमधून आपल्या अभिनयानं लाखो मनं जिंकणारी कंगना रनौत यावेळी पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरली. तिला भारतीय जनता पक्षाकडून तिकीट मिळाली आहे. मंडीमधून तिकीट मिळाल्यानंतर कंगनानं जोमाने प्रचार केला होता. लोकसभा निवडणुकीमुळे तिनं तिच्या आगामी 'इमर्जन्सी' या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही वाढवली. दरम्यान कंगनानं तिच्या पोस्टच्या कॅप्शन लिहिलं, "आईचे आशीर्वाद", तर दुसऱ्या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिनं लिहिलं ,"आई हे देवाचे रूप आहे." फोटोंमध्ये तिची आई तिला दही आणि साखर खाऊ घालताना दिसत आहे. दुसऱ्या फोटोमध्ये तिची आई तिच्या कपाळाची किस घेत आहे.

कंगना कोणाशी स्पर्धा करतेय? : शेअर केलेल्या फोटोमध्ये कंगनानं गुलाबी रंगाच्या साडी नेसली आहे, तर तिच्या आईनं सूट घातला आहे. याआधीही कंगनानं देवी मातेचे दर्शन घेतानाचे फोटो शेअर केले होते. कंगनानं एक व्हिडिओ देखील शेअर केला होता. यामध्ये ती निवडणूक निकालापूर्वी मंदिरात पूजा आणि आरती करताना दिसली होती. सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये कंगना मंडी लोकसभा मतदारसंघातून आघाडीवर आहे. तिच्याशी स्पर्धा करण्यासाठी काँग्रेसनं विक्रमादित्य सिंग यांना उमेदवारी दिली आहे. विक्रमादित्य सिंग हे महाराजा घराण्यातील असून सहा वेळा हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री झालेले वीरभद्र सिंग यांचे पुत्र आहेत. आता मंडीमधून कोण निवडून येणार याची अनेकजण प्रतीक्षा करत आहेत.

हेही वाचा :

  1. 'बिग बॉस ओटीटी 3'ला होस्ट करणार अनिल कपूर, अर्जुन कपूरनं केलं अभिनंदन - Anil Kapoor
  2. 'हमारे बारह'च्या दिग्दर्शकासह टीमला जीवे मारण्याच्या धमक्या, अन्नू कपूरनं घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट - Annu Kapoor meets CM Shinde
  3. श्रुती मराठे आणि गौरव घाटणेकर निर्मित नवीन मालिका 'भूमिकन्या'! - New serial Bhumikanya

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.