नवी दिल्ली - Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्याचं मतदान आज 25 मे रोजी होत आहे. सकाळपासून आठ राज्यांमध्ये मतदान सुरू झालं असून, देशाची राजधानी दिल्ली शहरातही आज मतदानाचा दिवस आहे. बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा मतदान करण्यासाठी दिल्लीला गेला आहे. आज सकाळी सिद्धार्थ मल्होत्रा मुंबई विमानतळावर स्पॉट झाला. दिल्लीत राहणाऱ्या अभिनेत्री ईशा गुप्तानं मतदान केल्यानंतर तिचे फोटो शेअर केले आहेत.
लाइट कॉफी कलरच्या पांढऱ्या टी-शर्ट आणि निळ्या रंगाच्या शर्ट-जॅकेटमध्ये सिद्धार्थ मुंबई विमानतळावर फुल ऑफ कॅज्युअल लूकमध्ये दिसत होता. यावेळी त्यानं डार्क सनग्लासेसचा चष्मा घातला होता. आता सिद्धार्थचे चाहते तो मतदान केल्यानंतर फोटो शेअर करेल याची प्रतीक्षा करत आहेत.
ईशा गुप्ता स्टायलिश लूकमध्ये दिल्लीत मतदान केंद्रावर पोहोचली होती. बेज कलरच्या पँटसह सुंदर पांढरा शर्ट घालून ईशा आली होती. सोशल मीडियावर मतदान केल्यानंतर अभिनेत्रीनं स्वतःचा एक फोटोही शेअर केला आहे.
या फोटोच्या कॅप्शनमध्ये ईशानं लिहिलं आहे की, 'दिल्लीवासीयांनो कृपया मतदान करण्यासाठी जा.' आज 25 मे रोजी दिल्लीतील सर्व 7 लोकसभा जागांवर सकाळी मतदान होत आहे. दिल्लीत सर्वात मोठी लढत ईशान्य दिल्लीच्या जागेवर आहे, ज्यामध्ये काँग्रेसच्या कन्हैया कुमारची थेट लढत भाजपचे विद्यमान खासदार मनोज तिवारी यांच्याशी आहे. या टप्प्यात जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती, कोलकाता उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश अभिजित गंगोपाध्याय आणि हरियाणाचे माजी मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांच्यासह ८८९ उमेदवार रिंगणात आहेत.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात शनिवारी गांधी कुटुंबातील सदस्य मतदानासाठी बाहेर पडले होते. यामध्ये प्रियांका गांधी वड्रा, रॉबर्ट वाड्रा आणि त्यांच्या मुलांचा समावेश होता. गांधी कुटुंबातील सर्व सदस्यांनी शनिवारी दिल्लीत मतदानाचा हक्क बजावला.
मतदान केल्यानंतर राहुल गांधी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याबरोबर शाई लावलेली बोटे दाखवत असलेला फोटो शेअर केला आहे.
हेही वाचा -
- करण जोहरचा ५२ वा वाढदिवस : बॉलिवूड स्टार घडवणाऱ्या करणचे आगामी प्रोजेक्ट आणि टॉप 5 चित्रपट - Karan Johars Birthday
- कान्स 2024 मध्ये भारताचा डंका, अनसूयानं सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जिंकून रचला इतिहास - Cannes 2024
- 'सिकंदर'साठी सलमान खान स्वत:च करणार अॅक्शन सीन्स, 'या' दिवसापासून सुरू होणार शूटिंग - Salman Khan