ETV Bharat / entertainment

दिवंगत गायक सिद्धू मूसवालाच्या नवजात भावाचा न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरवरील व्हिडिओ व्हायरल - Sidhu Moosewala Newborn Brother - SIDHU MOOSEWALA NEWBORN BROTHER

Sidhu Moosewala Newborn Brother : दिवंगत पंजाबी गायक सिद्धू मूसवालाच्या नवजात भावाचा फोटो न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअर बिलबोर्डवर झळकला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ सध्या व्हायरल झालाय.

Sidhu Moosewala Newborn Brother
सिद्धू मूसवालाचा नवजात भाऊ
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 22, 2024, 3:40 PM IST

मुंबई - Sidhu Moosewala Newborn Brother : दिवंगत पंजाबी गायक याचा लहान भाऊ जन्माला आलाय. सिद्धू मूसवालाचे आई-वडील बलकौर सिंग आणि चरण कौर यांच्या घरी पाळणा हालला असून या चिमुकल्याचे त्यांनी शुभदीप असं नामकरण केलंय. आता ही गुडन्यूज अमेरिकेतील न्यूयॉर्कच्या टाईम्स स्क्वेअरमध्ये झळकली असून बलकौर, शुभदीप आणि सिद्धू यांचे फोटो बिलबोर्डवर प्रसिद्ध झाले आहेत. आता याचे व्हिडिओ इंटरनेटवरही पसरले आहेत.

दिवंगत पंजाबी गायक सिद्धू मूसवालाचे आई-वडील बलकौर सिंग आणि चरण कौर यांनी अलीकडेच एका लहान मुलाचे स्वागत केले, ज्याचे नाव त्यांनी शुभदीप ठेवले आहे. त्यांचा दिवंगत भाऊ शुभदीप सिंग सिद्धू, जो सिद्धू मूसवाला म्हणून प्रसिद्ध आहे. न्यूयॉर्कच्या टाईम्स स्क्वेअरमध्ये बलकौर, शुभदीप आणि सिद्धू यांच्या प्रतिमा प्रदर्शित केल्या गेल्या आणि त्याचे व्हिडिओ इंटरनेटवर आले.

इंस्टाग्रामवर एका चाहत्याने एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये सिद्धू मूसवालाच्या बालपणीच्या फोटोसह बलकौर आणि शुभदीपचा फोटो तसेच सिद्धूचा त्याच्या वडिलांसोबतचा फोटो आहे. व्हिडिओ शेअर करताना चाहत्याने लिहिले की, "सिद्धू मूसावालासाठी हा एक मोठा क्षण आहे. न्यूयॉर्कच्या टाइम स्क्वेअरमध्ये त्याचे वडील आणि नवजात बाळाचा फोटो झळकला आहे."

बलकौर आणि चरण यांनी त्यांचा मुलगा सिद्धू मूसवालाच्या निधनानंतर दोन वर्षांनी त्यांच्या नवीन मुलाला जन्म दिला. सिद्धूची आई बलकौरने अलीकडेच बाळाचा एक फोटो शेअर केला होता. ज्यावर सिद्धूच्या फोटोसह 'महापुरुष कधी मरत नाहीत', असं लिहिलं होतं. याबरोबरच त्यांनी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या काळजीबद्दल च्यांचे आभार व्यक्त करणाराएक व्हिडिओही शेअर केला होता. यामध्ये नवजात मुलासह त्यांनी या सुंदर क्षणांचे दर्शन सिद्धू मूसवालाच्या चाहत्यांना दाखवले होते. हा प्रसंग साजरा करण्यासाठी त्यांनी केकही कापला होता.

सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टनधील एका व्हिडिओ मेसेजमध्ये बलकौर यांनी पंजाब सरकारवर मुलाच्या कायदेशीरपणाबद्दल कुटुंबावर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याचा आरोप केला होता. शुभदीपची गर्भधारणा इन विट्रो फर्टिलायझेशन (IVF) च्या माध्यामातून झाल्याच्या बातम्या आल्यानंतर या कुटुंबाने हे पाऊल उचलले होते. नवजात मुलाच्या जन्मासाठी सर्व आवश्यक कायदेशीर कागदपत्रे सरकारला सादर करण्यास तयार असल्याचेही त्यांनी सांगितले होते.

सिद्धू सूसेवाला याला 29 मे 2022 रोजी पंजाबमधील मानसा येथे वयाच्या 28 व्या वर्षी गोळ्या घालून ठार मारण्यात आल्याची घटना घडली होती. या हल्ल्यात मारेकऱ्यांनी त्यांच्यावर 30 हून अधिक गोळ्यांनी हल्ला केल्यानंतर केला होता. घटनेनंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्याला मृत म्हणून जाहीर केले होते. यामुळे संपूर्ण पंजाबसह मनोरंजन क्षेत्राला हादरा बसला होता.

हेही वाचा -

अ‍ॅलना पांडेच्या बेबी शॉवरमध्ये लिंगनिदान केल्याचे बिंग फुटले? नेटकऱ्यांनी व्यक्त केला संताप - Allana Pandey gender diagnosis

शाहरुख खान, आलिया भट्ट ठरले भारतातील सर्वात लोकप्रिय फिल्म स्टार, ऑरमॅक्स मीडियाने जाहीर केली यादी - Most Popular Film Stars in India

संजय लीला भन्साळींबरोबर अ‍ॅक्शन ड्रामा चित्रपट करण्याच्या तयारीत प्रियांका चोप्रा - Priyanka Chopra in Bhansali project

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.