मुंबई - Lal Salaam Box Office Day 1 Collection : साउथ फिल्म इंडस्ट्री सुपरस्टार रजनीकांत, विष्णू विशाल आणि विक्रांत स्टारर 'लाल सलाम' आणि अभिनेता शाहिद कपूर आणि क्रिती सेनॉन स्टारर फिल्म 'तेरी बातों में ऐसा उलझा जिया', 9 फेब्रुवारीला बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाले आहेत. आता बॉक्स ऑफिसवर 'लाल सलाम'ला चाहत्यांचं भरभरून प्रेम मिळत आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्या रजनीकांतनं केलंय. 'लाल सलाम' हा स्पोर्ट्स ड्रामा चित्रपट आहे. 'लाल सलाम'मध्ये सुपरस्टार रजनीकांतनं कॅमिओ केला आहे. त्यांनी या चित्रपटामध्ये मोईनुद्दीन भाईची व्यक्तिरेखा साकारली आहे. `
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
'लाल सलाम' चित्रपटाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस 1 : रजनीकांत यांचं नाव एखाद्या चित्रपटाशी जोडलं गेलं तर त्यांचे अनेक चाहते त्यांचा चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहांमध्ये जात असतात. त्यामुळे हा चित्रपट पाहण्यासाठी अनेकजण चित्रपटगृहांमध्ये गर्दी करताना दिसत आहेत. 'लाल सलाम'नं बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवशी 4.3 कोटींची कमाई केली. वीकेंडला हा चित्रपट आश्चर्यकारक कामगिरी करणार असल्याची अपेक्षा अनेकजण करत आहेत. तमिळनाडूमधील चित्रपटगृहांमध्ये 30.35 टक्के ऑक्युपन्सी रेट नोंदवला गेला आहे. 'लाल सलाम' 10 फेब्रुवारी रोजी, रिलीजच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच पहिल्या शनिवारी बॉक्स ऑफिसवर 6 ते 7 कोटी रुपये कमवू शकतो.
'लाल सलाम' चित्रपटाबद्दल : 'लाल सलाम' लायका प्रॉडक्शन अंतर्गत सुबास्करन अल्लिराजा निर्मित चित्रपट आहे. या चित्रपटामध्ये रजनीकांत, विष्णू विशाल आणि विक्रांत व्यतिरिक्त , विघ्नेश, लिव्हिंगस्टन, सेंथिल, जीविता, के.एस. आणि इतर कलाकार आहेत. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर येणाऱ्या दिवसात चांगली कमाई करणार अशी अपेक्षा केली जात आहे. दरम्यान जर रजनीकांतच्या आगामी चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर पुढे ते ' थलैवा 171', 'वेट्टयान' या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. 'वेट्टयान' या चित्रपटामध्ये त्यांच्यासह अमिताभ बच्चन दिसतील. या चित्रपटाची सोशल मीडियावर खूप चर्चा होताना दिसत आहे.
हेही वाचा :