ETV Bharat / entertainment

Margaon Express : "ते माझ्या हृदयाच्या जवळचे लोकेशन होते": 'मडगाव एक्स्प्रेस' गोव्यातच का शूट केले याचा कुणाल खेमूने केला खुलासा

Margaon Express : अभिनेता कुणाल खेमू 'मडगाव एक्स्प्रेस' या चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहे. याचं शूटिंग त्यानं गोव्याच्या सुंदर लोकेशन्सवर केलंय. या चित्रपटाचं कथानक आहे आणि याचं शूटिंग त्यानं गोव्यातच का केलं याचा खुलासा केला आहे.

Kunal Khemu
मडगाव एक्स्प्रेस
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 13, 2024, 10:01 AM IST

Updated : Mar 13, 2024, 11:28 AM IST

मुंबई - Margaon Express : दिव्येंदू, प्रतीक गांधी आणि अविनाश तिवारी मुख्य भूमिका साकारत असलेल्या 'मडगाव एक्सप्रेस' चित्रपटाचे दिग्दर्शन कुणाल खेमू करत आहे. या चित्रपटाचं शूटिंग गोव्याच्या अस्सल लोकेशन्सवर पार पडलंय. या चित्रपटासाठी मुंबईत आणि फिल्म सिटी किंवा इतरत्र कोठेही सेट उभारता आला असता. पण याचं शूटिंग त्यानं गोव्यातच करण्याचा निर्णय घेतला. याबद्दलच्या कारणांचा खुलासा कुणालनं केला आहे.

अलीकडेच कुणालने 'मडगाव एक्स्प्रेस' चित्रपटाच्या ट्रेलरचे लॉन्चिंग केले. ही तीन तरुण मुलांची हास्यकथा आहे. या तिघांनाही लहानपणापासून गोव्यात फिरायला जायचंय. तिथं जाऊन कशी धमाल मस्ती करायची याची त्यांनी स्वप्न पाहिलेत. पण वेगवेगळ्या कारणांनी त्यांचं हे स्वप्न लांबणीवर पडलंय. पण अखेर ते घराबाहेर पडतात आणि गोव्याला जाण्यासाठी 'मडगाव एक्स्प्रेस' पकडतात. त्यांचं स्वप्न सत्यात उतरत असताना त्याचं रुपांतर एका दुःस्वप्नात होतं. याची धमाल कथा कुणाल खेमूनं प्रेक्षकांसाठी तयार केली आहे. या चित्रपटात नोरा फतेही, उपेंद्र लिमये आणि छाया कदम हे देखील कॉमेडी ड्रामाचा एक भाग आहेत.

गोव्यातील शूटिंगच्या अनुभवाविषयी बोलताना कुणाल खेमू म्हणाला, "मला गोवा आवडतो, मी वेगवेगळ्या चित्रपटांच्या शूटिंगसाठी अनेकवेळा गोव्याला गेलो आहे आणि ते माझ्यासाठी सर्वात हृदयाच्या जवळचे ठिकाण आहे. गोवा म्हटल्यावर देशातील प्रत्येकाला माहित आहे की हे सर्व मजेशीर आहे, एक प्रकारचा उत्साह, सुंदर समुद्रकिनारे आणि त्याची ऐकू येणारी गाज. या चित्रपटात मी मुंबईत राहणाऱ्या तीन मुलांची गोष्ट सांगत आहे. त्यांना लहानपणापासून गोव्याला जायचंय पण गेली 20 वर्षे हे स्वप्न त्यांना हुलकावणी देतंय."

दोन वर्षापूर्वी म्हणजे ऑगस्ट 2022 मध्ये कुणाल 'मडगाव एक्स्प्रेस' चित्रपटाचं दिग्दर्शन करत असल्याची घोषणा केली होती. त्यावेळी त्यानं लिहिलं होतं. "गणपती बाप्पा मोरया! सर्व चांगल्या गोष्टी बाप्पाच्या नावानं सुरू होतात म्हणून मी तुम्हा सर्वांसोबत शेअर करण्यासाठी यापेक्षा चांगल्या दिवसाचा विचार करू शकत नाही. माझ्या डोक्यात एका विचाराने सुरुवात झाली, आणि ती गोष्ट माझ्या बोटांतून वाहणाऱ्या स्वप्नात वाढली. माझ्या लॅपटॉपवर शब्दांमध्ये उतरली आणि आता ती गोष्ट प्रत्यक्षात चितारत आहे. माझ्याशी भागीदारी केल्याबद्दल रितेश सिद्धवानी आणि फरहान अख्तर यांचे खूप खूप आभार. सिनेमाच्या दुनियेतील एका रोमांचक प्रवास करणार आहे. हात जोडून आणि डोके टेकवून मी तुम्हा सर्वांचे आशीर्वाद आणि गणपती बाप्पाचे आशीर्वाद घेत आहे. सादर करत आहे मडगाव एक्सप्रेस," असे त्यानं लिहिलं होतं.

'मडगाव एक्स्प्रेस' 22 मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे. रितेश सिधवानी आणि फरहान अख्तर यांनी त्याची निर्मिती केली आहे.

हेही वाचा -

  1. झी सिने अवॉर्ड्समध्ये किंग खानची धुम; 'जवान'नं मारली बाजी
  2. 'लाल सलाम'चे 21 दिवसांचे फुटेज झाले गायब, ऐश्वर्या रजनीकांतचा खुलासा
  3. Salman Khan : सलमान खाननं चाहत्यांना रमजानच्या दिवशी दिली अनोखी भेट

Last Updated : Mar 13, 2024, 11:28 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.