ETV Bharat / entertainment

वाढदिवस साजरा करून ग्रीसमधून क्रिती सेनॉन मुंबईत परतली, व्हिडिओ व्हायरल - kriti sanon returns to mumbai

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 6, 2024, 4:56 PM IST

Updated : Aug 6, 2024, 5:11 PM IST

Kriti Sanon : क्रिती सेनॉन तिचा वाढदिवस साजरा करण्यासाठी ग्रीसला गेली होती. आता ती मुंबई विमातळावर नुकतीच स्पॉट झाली. यानंतर तिचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

Kriti Sanon
क्रिती सेनॉन (Kriti Sanon - ANI)

मुंबई - Kriti Sanon : बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनॉन अलीकडेच तिच्या ग्रीस व्हेकेशनमुळे चर्चेत आली आहे. क्रितीनं ग्रीसमधून निळ्या नभाखाली आणि समुद्रकिनाऱ्यावर आपल्या स्वच्छंद सहलीचा मनमुराद आनंद लुटत काही व्हिडिओ आणि फोटो शेअर केले आहेत. ग्रीसमध्ये ती बहिण नुपूर सेनॉन, कथित बॉयफ्रेंड कबीर बहिया आणि काही मित्रांबरोबर गेली होती. दरम्यान, क्रितीचे स्मोकिंग करतानाचे देखील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आता क्रिती आपली सुट्टी एंजॉय करून भारतात परतली आहे. तिचा मुंबई विमातळावरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

क्रिती सेनॉन मुंबई विमानतळावर झाली स्पॉट : 5 ऑगस्ट रोजी मध्यरात्री ती मुंबई विमानतळावर स्पॉट झाल्यानंतर तिथे उपस्थित असलेले पापाराझीनं तिला कॅमेऱ्यात कैद केलं. एअरपोर्ट लुकसाठी तिनं काळ्या रंगाचा मिनी ड्रेस घातला होता. आता क्रिती सेनॉनचा लूक हा अनेकांना आवडत आहेत. अनेकजण तिच्या व्हिडिओवर कमेंट्स करून तिच्या लूकबद्दल कौतुक करताना दिसत आहेत. दरम्यान क्रिती जेव्हा पापाराझीशी बोलत होती, तेव्हा ती हसण्यापासून स्वतःला रोखू शकली नाही. यावेळी तिच्याबरोबर अनेक चाहत्यांनी फोटो देखील काढले. तसेच याआधी क्रितीनं तिच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनची झलक देखील सोशल मीडियावर चाहत्याबरोबर शेअर केली होती. यानंतर चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनी आणि चाहत्यांनी तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या.

क्रिती सेनॉनचे आगामी चित्रपट : तिनं आपल्या वाढदिवसाच्या केकसह फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलं होतं, "तुमच्या सर्व शुभेच्छांसाठी धन्यवाद. माझ्या डोळ्यांत अनेक स्वप्नं आहेत. मनापासून प्रेम आणि कृतज्ञता." दरम्यान क्रितीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ती आतापर्यंत शेवटची करीना कपूर खान आणि तब्बूबरोबर 'क्रू' चित्रपटामध्ये दिसली होती. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई केली होती. आता पुढं ती 'दो पत्ती'मध्ये काजोल आणि शाहीर शेखबरोबर दिसणार आहे. सध्या हा चित्रपट खूप चर्चेत आहे. याशिवाय ती 'हाऊसफुल 5' आणि 'किल बिल'च्या हिंदी रिमेकमध्ये दिसणार आहे.

हेही वाचा :

'सिस्टर्स डे' असताना क्रिती सेनॉननं नुपूरबरोबर साजरा केला 'फ्रेंडशिप डे', बहिणीबाबत व्यक्त केल्या भावना - friendship day 2024

क्रिती सेनॉननं भावी जोडीदारीबद्दल केला खुलासा - KRITI SANON

दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टमध्ये बॉलीवूड स्टार्सनी केला डान्स, पाहा व्हिडिओ - VARUN DHAWAN AND KRITI SANON

Last Updated : Aug 6, 2024, 5:11 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.