ETV Bharat / entertainment

जीतू भैय्या नव्या आव्हानासाठी पुन्हा सज्ज, 'कोटा फॅक्टरी सीझन 3' चा टीझर रिलीज - कोटा फॅक्टरी टीझर

टीव्हीएफच्या गाजलेल्या 'कोटा फॅक्टरी' वेब सिरीजचा तिसरा सिझन नेटफ्लिक्सवर प्रवाहित होणार आहे. याचा रंजक आणि प्रेरणादायी टीझर रिलीज करण्यात आलाय. या मालिकेतून विद्यार्थ्यांचा प्रिय मेंटॉर जीतू भैय्या पुन्हा परतला आहे.

Kota Factory Season 3
कोटा फॅक्टरी टीझर
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 1, 2024, 10:01 AM IST

मुंबई - भारतीय तरुणाईच्या हृदयावर राज्य करणाऱ्या 'कोटा फॅक्टरी' या लोकप्रिय मालिकेच्या निर्मात्यांनी गुरुवारी तिच्या तिसऱ्या सीझनचा टीझर लॉन्च केला. इंस्टाग्रामवर ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सने या मालिकेचा टीझर शेअर केला आहे. "तुमच्या पेन्सीलला टोकदार बनवा आणि सर्व फॉर्म्यूले आठवा - जीतू भैय्या आणि त्याचे विद्यार्थी नव्या सर्वात मोठ्या आव्हानासाठी सज्ज झाले आहेत.!!" असे टीझरच्या कॅप्शनमध्ये म्हटलं आहे.

आगामी 'कोटा फॅक्टरी'च्या तिसऱ्या सिझनमध्ये अभिनेता जितेंद्र कुमार, मयूर मोरे, अहसास चन्ना, आलम खान आणि रंजन राज प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. हा सिझन नेटफ्लिक्स ओटीटीवर प्रसारित होणार असला तरी प्रदर्शनाची तारीख अजूनही जाहीर करण्यात आलेली नाही.

या मालिकेच्या कथानकामध्ये सर्व विद्यार्थी IIT JEE परीक्षेसाठीची तयारी करताना अवघड अडथळ्यांची शर्यत धावताना आणि शैक्षणिक दबावाला न जुमानता स्वतःला सज्ज करतील. विद्यार्थ्यांचे अविचल गुरू जीतू भैय्याच्या साथीने आणि प्रेरणेने त्यांच्या कॉलिंगचा शोध घेण्याच्या स्वतःच्या मार्मिक प्रवासात, बहुप्रतीक्षित तिसऱ्या सीझनच्या या भरपूर नाट्य असलेल्या या मालिकेत विद्यार्थ्यांचे अनिश्चित भवितव्य प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणारं आहे, असे या नव्या सीझनच्या लॉगलाइनमध्ये लिहिण्यात आलंय.

'कोटा फॅक्टरी सीझन 3' पीआर टीमने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, "नेटफ्लिक्स बरोबरची आमची भागीदारी एकत्र सहकार्याचा आणि फायद्याचा प्रवास आहे. कोटा फॅक्टरी सीझन 1 आणि 2 चे साक्षीदार झालेल्या तरुणांसाठी ही आनंदाची बातमी आहे. नवा सिझन सुरू होत असताना जीतू भैय्याला सुरुवातीला एक विद्यार्थी म्हणतो, "स्वप्न फक्त पाहले जाऊ शकते, ध्येय गाठावं लागतं, जिंकण्याची तयारी करावी लागते." त्यावर जीतू भैय्या म्हणतो, "जिंकण्याची तयारी नाही तर तयारी हेच जिंकणं आहे भावा." असे म्हणत जीतू भैय्या विद्यार्थ्यांना प्रेरित करतो. हा आगामी सीझन चाहत्यांना गुंतवून ठेवण्याचे आश्वासन देत भावना आणि नाट्यमयतेनं भरलेला आहे." शोच्या मागील दोन सीझनला प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला होता.

हेही वाचा -

  1. वरुण, क्रिती ते विक्रांत मॅसीपर्यंत बॉलिवूड सेलेब्रिटींनी केले दीपिका-रणवीरचे अभिनंदन
  2. अनंत अंबानी, राधिका मर्चंट यांनी लग्न विधी सुरू होण्यापूर्वी केली 'अन्न सेवा'
  3. दीपिका रणवीरने दिली घरी पाळणा हलणार असल्याची गुडन्यूज

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.