मुंबई : साऊथ अभिनेता अल्लू अर्जुन अभिनीत 'पुष्पा द रुल'ची अनेकजण आतुरतेनं वाट पाहात आहेत. आता या चित्रपटाबद्दल एक रोमांचक अपडेट समोर आली आहे. साऊथ अभिनेत्री श्रीलीलानं अधिकृतपणे घोषणा केली आहे की, ती 'पुष्पा द रुल'चा भाग असणार आहे. या चित्रपटामध्ये ती एक आयटम साँग करणार असल्याची माहिती समोर आली आहे. तिच्या या आयटम साँगचं नाव 'किसिक' असेल. 'पुष्पा द रुल'च्या निर्मात्यांनी श्रीलीलाचं एक पोस्टर शेअर करून याबद्दलची माहिती दिली आहे. आता हे गाणं रुपेरी पडद्यावर रसिकांचे खूप मनोरंजन करेल असं सध्याचं चित्र दिसत आहे.
'द डान्सिंग क्वीन' श्रीलीलाची 'पुष्पा 2'मध्ये एंट्री : 'किसिक' गाणं आता पाहण्यासाठी अनेकजण आतुर आहेत. 'द डान्सिंग क्वीन श्रीलीला'नं सध्या या गाण्याच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. दरम्यान 'पुष्पा द राइज' चित्रपटांमध्ये अनेक खास गाणी आहेत. 'पुष्पा द राइज'मधील 'ऊ अंटावा' हे गाणं खूप लोकप्रिय झालं होतं. या गाण्यामध्ये साऊथ अभिनेत्री समांथा रुथ प्रभुनं धमाकेदार डान्स केला होता. 'ऊ अंटावा'ला मिळालेल्या पसंतीमुळे सुकुमार हे 'पुष्पा द रुल'मध्ये असेच गाणं तयार करत आहे. या गाण्यामध्ये श्रीलीलाला संधी दिल्यानंतर आता तिचे चाहते देखील खुश आहेत.
Sreeleela & Allu Arjun #Pushpa2TheRule song shoot 💥@sreeleela14 @alluarjun pic.twitter.com/x41qtFPuX6
— SreeLeela Trends ™ (@TrendsSreeLeela) November 9, 2024
'पुष्पा 2' कधी होणार प्रदर्शित : आता रुपेरी पडद्यावर श्रीलीलाचं आणि अल्लू अर्जुनचा धमाकेदार डान्स चाहत्यांना पाहायला मिळणार आहे. अलीकडेच या गाण्याच्या शूटिंगदरम्यानचा एक फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. यानंतर या फोटोवर अनेकांनी आपली प्रतिक्रिया देऊन, आपला आनंद व्यक्त केला होता. दरम्यान 'पुष्पा द राइज' हा लाल चंदनाच्या तस्करीच्या पार्श्वभूमीवर आधारित होता. हा चित्रपट 2021 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर प्रचंड यश मिळाले होते. आता त्याचाच सीक्वल म्हणून 'पुष्पा : द रुल' तयार करण्यात आला आहे. यात अल्लू अर्जुनबरोबर मुख्य भूमिकेत रश्मिका मंदान्ना दिसणार आहे. 'पुष्पा : द रुल' चित्रपट बॉक्स ऑफिसवर 5 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.
हेही वाचा :