मुंबई - laapataa ladies and oscar : चित्रपट निर्माता किरण राव यांच्या 'लापता लेडीज'नं 2024-25 ऑस्करसाठी अधिकृत प्रवेश केला. आपला चित्रपट ऑस्कर पुरस्कारांच्या व्यासपीठावर देशाचे प्रतिनिधित्व करेल, हे चित्रपट निर्मात्याचं स्वप्न असतं. आता हे किरण रावचं स्वप्न पूर्ण झालं आहे. फिल्म फेडरेशन ऑफ इंडिया सर्वोत्कृष्ट चित्रपटाची निवड करेल, असेही किरणनं एका संवादरम्यान सांगितलं होतं. 97 व्या अकादमी पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट परदेशी भाषेतील चित्रपट श्रेणीसाठी 2024-25 ऑस्करसाठी 'लापता लेडीज'नं प्रवेश केल्यानंतर आता किरण रावही आनंदी असल्याचं दिसत आहे. यापूर्वीदेखील अभिनेता आणि निर्माता आमिर खानचा 'लगान'देखील ऑस्करसाठी भारताकडून पाठविण्यात आला होता. मात्र, त्यावेळी भारताला ऑस्करनं हुलकावणी दिलं होती. दुसऱ्यांदा आमिर खान निर्माता असलेला चित्रपट ऑस्करसाठी जाणार आहे.
'लापता लेडीज'ची ऑस्करमध्ये एन्ट्री : फिल्म फेडरेशन ऑफ इंडियानं 97 व्या अकादमी पुरस्कारांसाठी भारताची अधिकृत प्रवेशिका म्हणून 'लापता लेडीज'चं नाव घोषणा केलं असून आता या चित्रपटाबद्दल सोशल मीडियावर चर्चा होताना दिसत आहेत. अनेकजण किरण राव यांचं अभिनंदन करत आहेत. किरण राव दिग्दर्शित, 'लापता लेडीज' सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म श्रेणीमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करेल. इतर उत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपटांसह प्रतिष्ठित सन्मान मिळविण्यासाठी हा चित्रपट भारताकडून प्रयत्न करताना दिसेल. भारतात आधीच धुमाकूळ घालणारा हा चित्रपट आता ऑस्करकडे वळला आहे.
किरण रावची 'लापता लेडीज'वर प्रतिक्रिया : एका वृत्तसंस्थेशी बोलताना किरण राव यांनी म्हटलं होतं, "कथा माझ्याशी अशा प्रकारे जोडली गेली की, त्यामागच्या विचारानं, मला एक प्रेरणा दिली आहे. जर दोन मुली हरवल्या तर त्यांचे काय होईल आणि त्या स्वतःबद्दल काय शिकू शकतील? जेव्हा मी स्क्रिप्ट वाचली तेव्हा मला वाटलं, की ही स्क्रिप्ट मला अनेक गोष्टी एक्सप्लोर करण्याची संधी देईल. मला असं वाटलं की आता काही करू शकतो." लैंगिक समानतेवर लक्ष केंद्रित करणाऱ्या या चित्रपटाचा गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये टोरंटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (TIFF) प्रीमियर झाला. या चित्रपटात रवी किशन, प्रतिभा रत्न, नितांशी गोयल,आणि स्पर्श श्रीवास्तव यांच्या प्रमुख भूमिका आहेत. 'ॲनिमल' आणि 'अट्टम'सह इतर 28 स्पर्धकांना मागे टाकत, किरण रावच्या चित्रपटाची निवड ज्येष्ठ चित्रपट निर्माते जाह्नू बरुआ यांच्या नेतृत्वाखालील प्रतिष्ठित ज्युरीनं केली आहे.
हेही वाचा :