मुंबई - Kiran Rao : हिंदी चित्रपटसृष्टीतील 'मिस्टर परफेक्शनिस्ट' आमिर खान चाहत्यांसाठी खूप खास आहे. आमिर उद्या त्याचा 59 वा वाढदिवस साजरा करणार आहे. याआधी आमिर खानची पूर्वाश्रमीची पत्नी किरण रावनं एक महत्त्वाचा खुलासा केला आहे. किरणनं तिच्या नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत आमिर खान त्याच्या पहिल्या पत्नीपासून दूर तिच्यामुळे झाला नसल्याचं सांगितलं. किरणने सांगितले की, ''जेव्हा आमिर खानचा घटस्फोट झाला, तेव्हा मी त्याच्याबरोबर बोललेही नव्हते. बरेच लोक म्हणतात की माझे आमिरबरोबर कनेक्शन 'लगान'च्या सेटवर झाले होते, मात्र तसे काही नाही.''असं पुढं तिनं म्हटलं, ते दोघेही 'स्वेदश' चित्रपटादरम्यान एकत्र आले होते.
किरणनं केला खुलासा : किरणनं पुढं म्हटलं की, 'मंगल पांडे' (2005) या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान काही जाहिरातींचे चित्रीकरण झाले होते आणि यादरम्यान ती आमिर खानशी जोडली गेली. 'लगान' चित्रपटानंतर हे सर्व घडल्याचेही किरणनं सांगितलं आहे. किरण पुढं म्हटलं की, ''लगान' आणि 'मंगल पांडे' चित्रपटादरम्यान मी आमिरला भेटले होते. यावेळी मी दुसऱ्या व्यक्तीबरोबर रिलेशनशिपमध्ये होते.'' आमिर खाननं आत्तापर्यंत दोनदा लग्न केलं आहे. आता तो आपल्या दोन्ही पत्नींपासून (रीना दत्ता आणि किरण राव) विभक्त होऊन घटस्फोटित जीवन जगत आहे. घटस्फोटानंतरही आमिर खान आपल्या दोन्ही पत्नींना भेटत असतो.
आमिर खानचा घटस्फोट : आमिर खानचं पहिलं लग्न 1986 मध्ये रीना दत्ताबरोबर झालं होतं आणि 2002 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला होता. यानंतर 2005 मध्ये आमिर खाननं किरण रावशी लग्न केलं आणि त्यानंतर 2021 मध्ये दोघांनी सोशल मीडियाद्वारे घटस्फोटाची घोषणा केली. आमिर खानला पहिल्या लग्नापासून जुनैद आणि आयरा खान आणि दुसऱ्या लग्नापासून एक मुलगा आझाद खान अशी मुले आहेत. आमिर खानच्या आगामी चित्रपटांबद्दल बोलायचं झालं तर तो 'लाहोर 1947' चित्रपटामध्ये दिसणार आहे. या चित्रपटाची निर्मिती आमिर स्वत: करत आहे. यामध्ये सनी देओल आणि प्रीती झिंटा मुख्य भूमिकेत असणार आहेत. दरम्यान, आमिर खान सध्या त्याचा आगामी चित्रपट 'सितारे जमीन पर'च्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे.
हेही वाचा :