ETV Bharat / entertainment

Kiara Advani :'योद्धा'मध्ये सिद्धार्थ मल्होत्राला पाहिल्यानंतर कियारा अडवाणी भावूक, चाहत्यांच्या व्हिडिओवर दिली प्रतिक्रिया - Sidharth Malhotra in Yodha

Kiara Advani : सिद्धार्थ मल्होत्रा स्टारर 'योद्धा' बॉक्स ऑफिसच्या कामगिरीची चर्चा आहे. एका महिला चाहत्यानं थिएटरमधून एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये ती सिद्धार्थला पाहून उत्साहित आणि भावूक दिसत आहे. या पोस्टवर कियारा अडवाणीनं प्रतिक्रिया दिली आहे.

Kiara Advani
कियारा अडवाणी
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 17, 2024, 12:49 PM IST

मुंबई - Kiara Advani : हिंदी चित्रपटसृष्टीचा अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या 'योद्धा' चित्रपटामुळे चर्चेत आहे. सिद्धार्थनं त्याच्या 'योद्धा' चित्रपटाचं जोरदार प्रमोशन केलं आहे. हा चित्रपट 15 मार्च रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला आहे. 'योद्धा' चित्रपट सिद्धार्थची पत्नी म्हणजेच कियारा अडवाणीनं पाहिला आहे. तिनं इन्स्टाग्राम स्टोरीवर तिचा रिव्ह्यू दिला आहे. कियारानं तिच्या इंस्टाग्राम स्टोरीजवर एका महिला चाहत्याचा व्हिडिओ पुन्हा पोस्ट केला आहे. यामध्ये सिद्धार्थ आपल्या स्टाईलमध्ये चालताना दिसत आहे.या पोस्टच्या क्लिपमध्ये चाहत्याने लिहिले की ''माझ्या आवाजावर जाऊ नको. मी खूप भावूक झाले आहे.'' यानंतर कियारानं या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिलं, "हाहा सेम बेब सेम." ही पोस्ट आता प्रचंड व्हायरल होत आहे.

Kiara Advani
कियारा अडवाणी

कियारा अडवाणीनं शेअर केली पोस्ट : 'योद्धा' चित्रपटामध्ये दिशा पटानी आणि साऊथ अभिनेत्री राशी खन्ना यांनी दमदार अभिनय केला आहे. हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी स्टार्स आणि सिद्धार्थच्या कुटुंबीयांना दाखवण्यात आला होता. या स्पेशल स्क्रिनिंगदरम्यान फिल्म इंडस्ट्रीतील अनेक कलाकार यावेळी उपस्थित होते. फिल्म प्रीव्ह्यूदरम्यान कियाराही तिथे पोहोचली. तिनं संपूर्ण चित्रपट पाहिला होता. यानंतर तिनं आपली प्रतिक्रिया दिली होती. या चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रा एका सैनिकाच्या भूमिकेत आहे. 'योद्धा' चित्रपटाचे दिग्दर्शन सागर आंब्रे आणि पुष्कर ओझा यांनी केलंय.

'योद्धा' चित्रपटाबद्दल : 'योद्धा' चित्रपटाची निर्मिती हिरू यश जोहर, करण जोहर आणि अपूर्व मेहता यांनी धर्मा प्रोडक्शनच्या बॅनरखाली केली आहे. सिद्धार्थ मल्होत्राला या चित्रपटाकडून खूप अपेक्षा आहेत. 'योद्धा' चित्रपटात दहशतवाद्यानं विमानाचे अपहरण केल्यानंतर प्रवाशांना वाचविणाऱ्या सैनिकाची काहणी आहे. या चित्रपटाचा एक मिनिटाचा टीझर 19 फेब्रुवारी 2024 रोजी रिलीज झाला. कियाराच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ती शेवटी 'सत्य प्रेम की कथा'मध्ये कार्तिक आर्यनबरोबर दिसली होती. पुढं ती 'डॉन 3' आणि' गेम चेंजर' या चित्रपटामध्ये दिसणार आहे.

हेही वाचा :

  1. Ed Sheeran And Diljit Dosanjh: एड शिरीननं दिलजीत दोसांझबरोबर स्टेजवर गायलं पंजाबी गाणं, चाहत्यांना बसला आश्चर्याचा धक्का
  2. Upasana meets President : राम चरणची पत्नी उपासना कोनिडेला यांनी घेतली राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांची भेट
  3. Pulkit And Kriti Wedding : पुलकित सम्राट आणि क्रिती खरबंदा यांच्या लग्नातील फोटो व्हायरल

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.