ETV Bharat / entertainment

गोव्यातील व्हेकेशनमधील मित्र आणि मैत्रीणींसह सिद्धार्थ मल्होत्रा कियारा अडवाणीचा सुंदर फोटो व्हायरल - Sidharth Malhotra and Kiara Advani - SIDHARTH MALHOTRA AND KIARA ADVANI

Kiara Advani Sidharth Malhotra: बॉलिवूड स्टार कपल कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा ​​यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये हे जोडपे त्यांच्या मित्र आणि मैत्रीणींबरोबर गोव्यातील व्हेकेशन एन्जॉय करताना दिसत आहेत.

Kiara Advani and Sidharth Malhotra
कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा ​​
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 30, 2024, 12:52 PM IST

मुंबई - Kiara Advani and Sidharth Malhotra : अभिनेत्री कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा ​बी-टाऊनमधील सर्वात लोकप्रिय जोडप्यांपैकी एक आहे. ही जोडी अनेकांना खूप आवडते. काही दिवसांपूर्वीच हे जोडपे मुंबई विमानतळावर दिसले होते. आता या जोडप्याचा एक फोटो समोर आला आहे. या फोटोमध्ये ते त्यांच्या मित्र आणि मैत्रीणींबरोबर दिसत आहे. कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांचे फोटो यांच्या फॅन पेजवर शेअर करण्यात आले आहेत. आता हे व्हायरल झालेले फोटो, या जोडप्याच्या चाहत्यांना खूप आवडत आहेत. फोटोमध्ये कियारा आणि सिद्धार्थ त्यांच्या मित्रांबरोबर पोझ देताना दिसत आहे.

सिद्धार्थ आणि कियाराचं लूक : सिद्धार्थच्या लूकबद्दल बोलायचं झालं तर तो शॉर्ट्स आणि डेनिम शर्टमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. दुसरीकडे कियारा हिरव्या रंगाच्या प्रिंटेड वन पीसमध्ये खूप देखणी दिसत आहे. कियारा आणि सिद्धार्थ अनेकदा सुंदर फोटो चाहत्यांबरोबर शेअर करत असतात. या दोन स्टार्सच्या प्रोफेशनल लाईफबरोबर त्यांच्या पर्सनल लाईफही खूप चर्चेत असते. कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांनी राजस्थानमध्ये 7 फेब्रुवारी 2023 रोजी लग्नगाठ बांधली. या जोडप्याचं लग्न खूप चर्चेत होतं. या जोडप्याची प्रेमकहणी 'शेरशाह' चित्रपटाच्या सेटवर सुरू झाली होती. हा चित्रपट अनेकांना आवडला होता. हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित होता.

वर्कफ्रंट : दरम्यान, या जोडप्याच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर सिद्धार्थ शेवटी 'इंडियन पोलीस फोर्स' या वेब सीरीजमध्ये दिसला होता. या वेब सीरीजमध्ये तो शिल्पा शेट्टी, विवेक ओबेरॉय, श्वेता तिवारी, शरद केळकर आणि ईशा तलवारबरोबर दिसला होता. या वेब सीरीजचं दिग्दर्शन रोहित शेट्टीनं केलं होत. दुसरीकडे कियारा ही एस शंकर दिग्दर्शित 'गेम चेंजर' या पॉलिटिकल ॲक्शन थ्रिलर चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात राम चरण महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय ती 'डॉन 3' चित्रपटामध्ये रणवीर सिंगबरोबर दिसणार आहे. तसेच तिच्याकडे मेघना गुलजारचा एक आगामी प्रोजेक्ट आहे.

हेही वाचा :

  1. प्रभासच्या 'कल्की 2898 एडी'ची तुलना 'ड्युन'शी करणाऱ्यांना नाग अश्विनने दिलं उत्तर - Kalki 2898 AD
  2. भारतीय चित्रपटांचे जनक दादासाहेब फाळके यांची आज जयंती, 'अशी' केली होती देशातील पहिल्या चित्रपटाची निर्मिती - DADASAHEB PHALKEB BIRTH ANNIVERSARY
  3. मे 2024 मधील आगामी बॉलीवूड चित्रपट आणि वेब सीरीजबद्दल जाणून घ्या, पाहा यादी - UPCOMING MOVIES AND WEB SERIES

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.