ETV Bharat / entertainment

कियारा अडवाणी आणि ऐश्वर्या राय बच्चन कान फेस्टिव्हलसाठी रवाना - KIARA ADVANI AND AISHWARYA RAI - KIARA ADVANI AND AISHWARYA RAI

2024 Cannes Film Festival : 77वा कान फिल्म फेस्टिव्हलसाठी अनेक स्टार्स फ्रान्सला जात आहे. आता कियारा अडवाणी, ऐश्वर्या रॉय बच्चन आणि आराध्या या मुंबई विमातळावर स्पॉट झाल्या आहेत.

Kiara Advani and Aishwarya Rai
कियारा अडवाणी आणि ऐश्वर्या राय (आराध्या संग ऐश्वर्या राय बच्चन फाइल फोटो(ANI Photo) कियारा आडवाणी का फाइल फोटो(IANS))
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 16, 2024, 10:27 AM IST

मुंबई - 2024 Cannes Film Festival : फ्रान्समध्ये आयोजित 77 वा कान फिल्म फेस्टिव्हल खूप चर्चेत आहे. अनेकजण कान फिल्म फेस्टिव्हलची आतुरतेनं वाट पाहत आहेत. 14 मे रोजी कान फिल्म फेस्टिव्हलचे उद्घाटन मोठ्या थाटामाटात करण्यात आलं. दरम्यान, काही बॉलिवूड स्टार्स या सोहळ्यात फ्रान्समध्ये पोहचले आहेत. या सोहळ्यामध्ये सामील होण्यासाठी कियारा अडवाणी जात आहे. ती पहिल्यांदा कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये पदार्पण करणार आहे. बुधवारी मध्यरात्री मुंबई विमानतळावर कियारा कॅमेऱ्यात कैद झाली. आता तिचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

कियारा अडवाणी विमातळावर झाली स्पॉट : व्हिडिओमध्ये कियारा तिच्या कारमधून खाली उतरताना दिसली. यावेळी तिनं पांढऱ्या रंगाच्या टॉपवर स्वेटटॉपसह क्रिम रंगाचे लांब जॅकेट घातले असून या लूकला मॅच होणार पॅन्ट परिधान केली होती. यावर तिनं लाईट मेकअप केला होता. याशिवाय तिच्या हातात एक पिवळ्या रंगाची पर्स होती. तसेच तिनं लूकला आणखी खास बनवण्यासाठी सनग्लास लावला होता. विमानतळाच्या आत जाण्यापूर्वी, तिनं एंट्री गेटवर मोठ्या स्माईलसह पापाराझींना फोटोसाठी पोझ दिली. कियाराचा हा सुंदर लूक आता अनेकांना आवडला आहे.

ऐश्वर्या आणि आराध्या विमातळावर झाल्या स्पॉट : याशिवाय सोहळ्यात ऐश्वर्या आणि आराध्या देखील जात असल्याचं दिसलं. दोघीही माय -लेकी या मुंबई विमातळावर बुधवारी रात्री उशिरा एकत्र स्पॉट झाल्या. यावेळी ऐश्वर्याच्या उजव्या हातावर आर्म स्लिंग असल्याचं दिसले, तिच्या हाताला बॅन्डेज होते. पापाराझीनं ऐश्वर्याला यावेळी काळजी घेण्यास सांगितलं. यावर तिनं त्यांना धन्यवाद म्हटलं. ऐश्वर्यानं एअरपोर्टसाठी सुंदर लुक निवडला होता. काळ्या पॅन्ट आणि टॉपबरोबर निळ्या रंगाचे लांब जॅकेट तिनं घातलं होतं. तर आराध्यानं पांढऱ्या स्वेटशर्टसह काळ्या रंगाचा पॅन्ट परिधान केला होता. एअरपोर्टवर ऐश्वर्यानं पापाराझींना फोटोसाठी पोझ दिली. ऐश्वर्या राय बच्चनच्या कान पदार्पणाबद्दल बोलायचं झालं तर तिनं 2002 मध्ये कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये पदार्पण केलं होतं. ऐश्वर्या राय बच्चन आणि कियारा अडवाणी व्यतिरिक्त उर्वशी रौतेला, शोभिता धुलिपाला, जॅकलीन फर्नांडिस आणि आदिती राव हैदरी यांच्यासह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी यावर्षी कानच्या रेड कार्पेटवर ग्लॅमरस लूक दाखवताना दिसणार आहे.

हेही वाचा :

  1. कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये उर्वशी रौतेलाचा जलवा, दीपिका पदुकोणच्या लूकची करुन दिली आठवण - urvashi rautela
  2. तेलंगणातील थिएटर्स 10 दिवस बंद राहणार, जाणून घ्या कारण? - Single screen theaters closed
  3. आंतरराष्ट्रीय कुटुंब दिननिमित्त पाहा हे पाच बॉलिवूड चित्रपट - INTERNATIONAL FAMILY DAY 2024

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.