मुंबई Khatron Ke Khiladi 14 Winner: 'खतरों के खिलाडी 14' हा शो खूप चर्चेत होता. तीन महिन्यांहून अधिक रोमांचक प्रवासानंतर, या शोला करण वीर मेहराच्या रुपानं विजेता मिळाला आहे. अंतिम फेरीत, करणची स्पर्धा कृष्णा श्रॉफ आणि गश्मीर महाजनी यांच्याबरोबर होती. या दोघांना पराभूत करून त्यानं चमकणारी ट्रॉफी, 20 लाख रुपये रोख आणि एक कार जिंकली आहे. आता सोशल मीडियावर करण वीरचे चाहते हे त्याचे अभिनंदन करत आहेत. 'खतरों के खिलाडी 14'चा ग्रँड फिनाले खूपच दमदार होता. शोचा शेवटचा टास्क पाणी हवा आणि हेलिकॉप्टर सारख्या ट्विस्ट स्टंटनं भरलेला होता.
'खतरों के खिलाडी 14'चा विजेता करण वीर मेहरा : सर्वच स्टंट पार करुन करण वीरनं आपल्या नावावर ट्रॉफी केली आहे. करण वीरनं शेवटचे टास्क हे सर्वात कमी वेळेत पूर्ण केले. या शोमध्ये आलिया भट्ट, वेदांग रैना, भारती सिंग, निया शर्मा आणि कश्मिरा शाह या स्टार्सनीही फिनालेमध्ये कॅमिओ केला. या विजयानंतर काही तासांनी करण वीरनं एका मुलाखतीत त्याच्या विजयाबद्दल म्हटलं, "शो जिंकण्यापेक्षा मला ट्रॉफी जिंकण्याची इच्छा होती. मला वाटते प्रत्येकाची हीच इच्छा होती. पण नाव जाहीर होत असताना सर्व काही शांत झालं होतं. आजूबाजूला काय चाललं आहे याची मला अजिबात कल्पना नव्हती. सर्व काही स्लो मोशनमध्ये सुरू असल्याचं वाटत होतं. "
'खतरों के खिलाडी 14'चे स्पर्धक : करण वीरनं पुढं सांगितलं, "रोहित शेट्टी सरांनी माझ्या नावाची घोषणा केली, तेव्हा मी बेशुद्ध पडलो होतो. 'खतरों के खिलाडी 14'चा विजेता बेशुद्ध झाला तर बरे वाटणार नाही." दरम्यान 'खतरों के खिलाडी'चा 14वा सीझन चित्रपट निर्माता रोहित शेट्टीनं होस्ट केला होता. या शोचं शूटिंग हे रोमानियामध्ये झालं होतं. या शोमध्ये कृष्णा श्रॉफ, असीम रियाझ, सुमोना चक्रवर्ती, गश्मीर महाजनी, आशीष मेहरोत्रा, शिल्पा शिंदे, अभिषेक कुमार, नियति फतनानी, करण वीर मेहरा, अदिती शर्मा, निमृत कौर अहुलवालिया आणि शालीन भनोट हे स्पर्धक दिसले होते.