मुंबई : साऊथ अभिनेत्री कीर्ती सुरेशनं अखेर बॉयफ्रेंड अँटोनी थट्टिलबरोबर लग्न केलं आहे. कीर्ती सुरेश आणि अँटोनी हे 15 वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते.अलीकडेच, कीर्तीनं तिच्या सोशल मीडिया हँडलवर लग्नामधील काही अप्रतिम फोटो शेअर केले आहेत. आता या फोटोवर अनेकजण प्रेमाचा वर्षाव करत असून तिला लग्नासाठी शुभेच्छा देत आहेत. आज 12 डिसेंबर रोजी हिंदू रितीरिवाजांनुसार या जोडप्याचं लग्न केल्यानंतर दोघेही चर्चेत आले आहेत. तसेच उद्या 13 डिसेंबरला ख्रिश्चन रितीरिवाजांनुसार लग्न होणार आहे. लग्नामधील फोटो शेअर करत कीर्तीनं पोस्टमध्ये लिहिलं, 'नायकीच्या प्रेमासाठी.' आता सोशल मीडियावर कीर्ती सुरेशच्या लग्नाची फोटो खूप वेगानं व्हायरल होत आहेत.
कीर्ती सुरेशचं लग्न : कीर्ती सुरेशनं गेल्या महिन्यातच सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या प्रेमप्रकरणाची घोषणा केली होती. लग्नापूर्वी तिनं तिरुमाला वेंकन्ना इथे भेट देऊन आशीर्वादही घेतला होता. किर्ती आणि अँटोनी यांच्या लग्नसोहळा खूप थाटात साजरा झाला आहे. 12 डिसेंबर रोजी कीर्तीनं लग्न करून आपल्या चाहत्यांना एक सुखद धक्का दिला आहे. दरम्यान कीर्ती सुरेशचा 'बेबी जॉन' हा चित्रपट रुपेरी पडद्यावर लवकरच रिलीज होणार आहे. या चित्रपटामध्ये तिच्याबरोबर वरुण धवन असणार आहे. या चित्रपटाच्या माध्यामातून ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. कीर्ती सुरेशचे फोटो व्हायरल झाल्यानंतर आता चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार तिला शुभेच्छा देत आहेत.
कीर्तीची सुरेशची प्रेमकहाणी : सध्या कीर्ती सुरेश तीन-चार दिवसांपूर्वी गोव्याला जाताना स्पॉट झाली होती. यानंतर तिनं लग्नाचे काम सुरू झाल्याची पोस्ट देखील शेअर केली होती. दरम्यान कीर्तीनं तेलुगू, तामिळ आणि मल्याळम या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तिचा 'दसरा' हा चित्रपट ब्लॉकबस्टर झाला होता. यानंतर तिनं 'भोला शंकर'मध्ये काम केलं. हा चित्रपट देखील खूप गाजला होता. दरम्यान कीर्तीची सुरेशच्या प्रेमकहाणीबद्दल बोलायचं झालं तर ती हायस्कूलमध्ये असताना आणि अँटनी कोचीमध्ये ग्रॅज्युएशन पूर्ण करत असताना त्यांची प्रेमकहाणी सुरू झाली होती. अँटोनी हा एक व्यापारी असून दुबईत राहतो.
हेही वाचा :